श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भक्तिमय वातावरणात सांगता
Alert – Language change facility is available on website for all readers. Accordingly, you can read news in English, Gujarati, Hindi, Punjabi, Marathi, Telugu and Urdu languages
पंढरपूर / प्रतिनीधी – आदीशक्ती मुक्ताबाई यांच्या ७२७ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याची गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात सांगता झाली .
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर यांच्या वतीने समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर , कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र पंढरपूर ते करमाळा , अहमदनगर , छत्रपती संभाजीनगर , जामनेर , भुसावळ , श्री क्षेत्र मुक्ताईनगर , बुलढाणा , चिखली , जालना , बीड , बार्शी व पंढरपूर असा सात दिवसांचा पादुका पालखी सोहळा काढण्यात आला होता . या सोहळ्याचे पौरोहित्य कुलदीप कुलकर्णी , अनिरुध्द कुलकर्णी व मेघराज वळखे पाटील यांनी केले .
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या विश्वस्थ शकुंतला नडगिरे , ज्ञानेश्वर जळगांवकर , नित्योपचार विभाग प्रमुख संजय कोकीळ , सह विभाग प्रमुख अतुल बक्षी , श्री संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र पाटील ,संग्राम पाटील , मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र महाराज हरणे, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे आदी उपस्थित होते.
गुरुवारी सकाळी बीड मुक्कामानंतर हा सोहळा वाशी जि उस्मानाबाद येथे पोहोचला . वासकर सांप्रदायीक भजनी मंडळाचे वतीने प्रशांत बाबा चेडे व ग्रामस्थानी सोहळ्याचे फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले . पादुकांची गावातून भव्य दिंडी मिरवणुक काढण्यात आली . दुपारचा नवेद्य व विश्रांतीनंतर सोहळा बार्शी येथे श्री भगवंत भेटीसाठी पोहोचला . येथे पादुका भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर तो सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचला . येथे सोहळ्याची विधीवत सांगता करण्यात आली .
काही क्षणचित्रे