रावेर तालुक्यात श्रीराम पाटलांचा झंझावाती प्रचार !
रावेर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रावेर तालुक्यातील प्रचार दौऱ्यात अजंदे, निंबोल, ऐनपुर, खिर्डी बु, खिर्डी खु , या गावांना श्रीराम पाटलांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजविणारा माणूस चिन्हा समोरील बटण दाबून भरघोस मतधिक्क्यांनी विजयी करण्यासाठी मतदारांना साकळे घातले.
यावेळी सोबत काँगेस नेते तथा रावेर विधानसभेचे आमदार शिरीषदादा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद बोंडे, काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सेलचे आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, मोहन पाटील, प्रगतशील शेतकरी संजय पाटील, लाला पाटील, हिरामण पाटील, एकनाथ कोळी, संदीप धनगर , यशवंत धनके, राजीव सवर्णे, पांडुरंग पाटील, निलेश पाटील, बाळू पाटील, प्रवीण दिगंबर सोनवणे, ऐनपुर सरपंच अमोल महाजन, किशोर पाटील, अरविंद महाजन, निंभोरा सरपंच दिगंबर चौधरी, काशिनाथ शेलोडे, बाळासाहेब पवार , सुनील कोंडे , मिलिंद बोंडे , अब्दुल मुतालिब, राकेश घोरपडे, दिलरुबाब तडवी, लक्ष्मण मोपारी, दीपक पाटील, कल्लू पहलवान, पांडुरंग पाटील (खिरोदा) यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रचारातील काही क्षणचित्रे