रक्षा खडसेंच्या अडचणी वाढणार ? भाजप शहराध्यक्षांची पोस्ट अंगलट येण्याची शक्यता !
रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे समर्थक असलेल्या भाजप शहराध्यक्ष पंकज कोळी -सोनवणे याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार यांची उर्दू मधील डमी पत्रिका पोष्ट करून ,देशातील एकमेव उमेदवार जे उर्दुतील डमी पत्रिका वाटत आहे असे म्हटले असून या माध्यमातून टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु भाजप मधील मुस्लिम कार्यकर्ते यामुळे प्रचंड नाराज झालेले असून या पोस्ट वर नेटकर्मी भडक कमेंट करीत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे.
तर एकनाथ खडसेंचे दुसरे कट्टर समर्थक असलेले सतीश चौधरी यांनी श्रीराम पाटील यांना हाजी म्हणून संबोधले आहे. त्यामुळे सतीश चौधरींनी हाजी ची व्याख्या कळते का ? असा सवाल करून आरिफ आझाद यांनी याबद्दल मुस्लिम समाजात प्रचंड चीड निर्माण झाल्याचे सांगितले. व याचे परिणाम रक्षा खडसेंना नक्कीच भोगावे लागतील असेही सांगितले. तसेच मुस्लिमांच्या मतांसाठी एकनाथ खडसेंनी उर्दुतील डमी पत्रिका यापूर्वी वाटल्याचे पुरावे सादर केले आणि खडसेंनी मुस्लिम टोपी घातल्याचे फोटो व्हायरल केले तर तोंडावर आपटले जाल असा जळजळीत इशारा देखील आझाद यांनी दिला आहे. त्यामुळे राजकारण करा पण खालच्या पातळीवर उतरून करू नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे.