26/11 भ्याड हल्ल्याप्रकरणी वडेट्टीवारांचे संतापजनक वक्तव्य, मुक्ताईनगरात शिवसेनेचे निदर्शने आंदोलन !
आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर आता शिवसेनेने आक्रमक भूमिक घेतली असून त्यांच्याविरोधात मुक्ताईनगर येथे निदर्शने आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी दाखल केली आहे.
यावेळी निवेदन देतेवेळी उपजिल्हा प्रमुख छोटू भोई,तालुका प्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, नगरसेवक निलेश शिरसाट , संतोष मराठे, योगेश मुळक,संतोष माळी, प्रवीण चौधरी, गणेश पाटील , सुभाष माळी,गणेश भोजने, गणेश घाईट, स्वप्नील श्रीखंडे आदींची उपस्थिती होती.