पिंजऱ्यात सुविधा मिळू शकतात , पण आकाशातील उड्डाण नाही
Cage facilities may be available, but sky flight is not
दि. 5 मार्च मंगलवारला सकाळी संत नगरी
मुक्ताईनगर शहरात पद्मभूषण पुरस्काराने
सन्मानित जैन आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांचे आगमन झाले असता शहरात सकल जैन श्रीसंघ द्वारा भव्य शोभायात्रा काढून आचार्य भागवतांचे स्वागत करण्यात आले.
जैन मंदिरात आगमन झाल्यानंतर श्री संघच्या वतीने आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी यांच्या जाहीर प्रवचनाचे आयोजन संताजी भवन संतांनी नगर येथे करण्यात आले होते. प्रवचनात आचार्यांनी सांगितले की आपल्या जवळ सुख कोणते आहे ? पिंजऱ्याचे की
आकाशाचे ? पिंजऱ्यात फक्त सुविधा मिळू शकतात पण उड्डाण घेण्यासाठी आकाशाची सफर करवी
लागेल.
जर आकाशाच्या स्पर्शाचे आनंद पाहिजे तर त्याचे पाच पर्याय आहेत
१) हेल्प फुलनेस :- सर्वांसाठी सहाय्यक बना , सहाय्यक करणारा सर्वांना प्रिय असतो । आपल्या परिवारात संवेदनशीलतेचे स्तर किती आहे ?
२) होप फुलनेस :- नेहमी आशावादी बनून
राहा , दुःख हे काही वेळे पुरते असते , त्यावेळेस जर आपण आपल्या मनाला सांभाळून घेतले तर सुख आपल्यापासून दूर नाही .
३)हार्टफुलनेस :- कोणालाही प्रेम असल
देताना तो आनंद अनुभव करा
४)हेप्पीनेस :- प्रसन्नता। योग्य दृष्टीकोन हीच प्रसन्नता आहे. ज्या ज्या समस्येचे कोणतेही समाधान नाही त्या समस्येला समस्या मानने सोडून द्या
५)हेल्प :- आपल्या आरोग्याची काळजी घ्या , आपन अश्या व्यपारात पुढे जाणार नाही ज्यात आपल्या आरोग्याला हानी पोहोचल .
जीवन आनंदित जगण्याचे हे पाच पर्याय आहेत.
जाहीर प्रवचन श्रवणाचे जैन समाज बांधवांसह शहरातील बांधवांनी लाभ घेतला.
तसेच ५ मार्च ते ११ मार्च पर्यंत दररोज सकाळी ९ ते १० जाहीर प्रवचन संताजी भवन येथे राहील.