आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना प्रचंड यश संत मुक्ताई मंदिरासाठी १५ कोटी उपलब्ध होणार !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थित महत्वपूर्ण आढावा बैठक मंत्रालय मुंबई येथे पार पडली.
मुंबई :संत मुक्ताई मंदिर समाधी स्थळ (कोथळी) मुक्ताईनगर या मंदिराचे बांधकाम रखडलेले असून या बांधकामावर नवीन DSR रेट नुसार निधी मागणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक मंत्रालयात आज दि ७ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी आमदारांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयात संत मुक्ताई मंदिराच्या महतीचे व रखडलेल्या बांधकाम तसेच महत्वपूर्ण बाबींचे थेट प्रेझेंटेशनच मंत्रालयात सादर केले. सर्व बाबी समजून घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक चर्चा करित वाढीव नवीन प्रस्तावानुसार १५ कोटी रु.निधी येत्या ५ ते ६ दिवसात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून तशा सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी उर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे,सचिव एकनाथ डवले, मंत्रालयातील अधिकारी राजेशकुमार मिणा, विकास खर्गे,मनु श्रीवास्तव , संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रविंद्र हरणे महाराज , संत मुक्ताई मंदिर समाधी स्थळ व्यवस्थापक ह भ प उद्धव जुनारे महाराज, मुक्ताईनगर येथील विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, महेंद्र मोंढाळे(कोळी) यांच्यासह इतर मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच इतर पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
मुद्दे :
१) पहिल्या टप्प्यात १३ कोटी रु. मंजूर होते यापैकी ९ कोटी रु. प्राप्त होऊन बांधकाम अपूर्ण अवस्थेत पडलेले होते.
२) पुन्हा कामास सुरुवात करायची म्हटली तर २०१६ चे DSR रेट आणि सद्याचे २०२३ चे DSR रेट यात जमीन आस्मान चा फरक झाल्याने रखडलेले काम जास्त अडगळीत पडताना दिसून येत होते.
३) वरील सर्व बाबींचा अभ्यास पूर्ण आलेख तयार करून आमदार चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक विभागाला नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केलेल्या होत्या आणि यासंदर्भात वाढीव निधीची तरतूद होनेसाठी आढावा बैठकीची मागणी केली होती.
४) यानुसार आज सदरील विषया संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि रखडलेले बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन मंदिर बांधकामासाठी वाढीव १५ कोटी रु. निधी येत्या ५ ते ६ दिवसात उपलब्ध होणाऱ्या मार्गही मोकळा झाला.
” आज संत मुक्ताई मंदिर बांधकाम लवकर पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सकारात्मक चर्चा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब तसेच आमदार चंद्रकांत पाटील साहेब यांनी पूर्ण वेळ देवून सकारात्मक चर्चा केली आणि निधी उपलब्ध करून देण्याचा सांगितले याबद्दल खूप समाधान वाटले असे बैठकीत उपस्थित असलेले संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी सांगितले.”