Breaking News: शेतकऱ्यांचे प्रस्ताव परत करणे विमा कंपन्यांना महागात पडणार !
आ.चंद्रकांत पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सचिवांना ही सूचना !
मुंबई : शेतकऱ्यांकडून विमा हप्ता भरून घेतला , त्यांच्या खात्यातून विमा हप्त्याची रक्कम अदा करून घेतली आणि ३ महिन्यांनी विमा कंपनीला कोणता साक्षात्कार झाला ? त्यामुळे विमा कंपनी ला शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणे जड जात असल्याचा आरोप करून विमा कंपन्यांवर अंकुश लावण्याची व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ अदा करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील लागलीच सचिव एकनाथ डवले यांना विमा कंपन्यांना पत्रव्यवहार करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, चालू वर्षाचा केळी पिक विमा हप्ता हा शेतकऱ्यांकडून शेवटची मुदत 30 ऑक्टोबर पर्यंत भरून घेतला गेला तसेच त्यांच्या खात्यातून विमा हप्त्याचे पैसे वेळेत अदा करून घेतले या प्रक्रियेला तीन महिन्यांचा अवधी उलटून गेला असताना विमा कंपनीला अचानक साक्षात्कार झाला व त्यांनी शेतकऱ्यांना जाचक अटीमध्ये अडकविण्याचे काम सुरू केलेले असून केळी पिक विम्याचे अनेकांचे प्रस्ताव कंपनीने परत पाठविण्याचे वृत्त एका प्रसिद्ध दैनिकात प्रसिद्ध झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे मुळात परत प्रस्ताव पाठवण्याची कारणे पाहता शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई देणे विमा कंपनीच्या जिव्हारी बसत असल्याचे दिसून येत आहे पिक विमा कंपनी विमा नोंदविताना शेतकऱ्यांचे क्षेत्र असलेल्या शिवारात आपले प्रतिनिधी पाठवून जिओ टॅगिंग यंत्रणा वापरून क्षेत्र नोंदवित असते. सोबत सॅटॅलाइट इमेज घेतली जाते ती घेतल्याशिवाय विमा प्रस्ताव पुढील कारवाईस पात्र होत नाही तसेच नफ्याने शेती करणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून त्यासंबंधी प्रस्तावात रीतसर कागदपत्रे जोडली असताना देखील असे असताना मूळ मालकाचे आधार कार्डवर अटेस्टेड मागविले जात आहे यावरून असे निष्पन्न होते की विमा कंपनी शेतकऱ्यांवर अविश्वास दाखवीत आहे विमा नोंदविताना शेतकऱ्यांकडून विम्याचा हप्ता प्रथमता भरून घेतला जातो या माध्यमातून हजारो कोटी रुपये पिक विमा कंपनीकडे जमा असतात विमा प्रस्ताव नोंदविताना बारीक बारीक निकष तपासून खात्री केल्याशिवाय विमा प्रस्ताव दाखल करून घेतला जात नाही परंतु विमा कंपनीने संभाव्य नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना भेटीस धरण्याचा संताप जनक प्रकार सुरू केला आहे त्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थतेचे वातावरण आहे आणि त्यामुळे अन्याय झाल्याच्या भावनेतून शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट निर्माण झालेली आहे . याकरिता सदरील विमा कंपन्यांमध्ये अंकुश ठेवण्यात यावा आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.