Turkiye Earthquake: तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी आलेल्या विनाशकारी भूकंपाने (Turkiye Earthquake) सर्व काही उद्ध्वस्त केले. या भूकंपात 5000 हून अधिक लोक मरण पावले, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे हजारो इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. अशातच तुर्की याथील रेस्क्यू ऑपरेशनचा एक व्हिडीओ (Turkiye Earthquake Video) समोर आला आहे. बघूया काय आहे व्हिडीओमध्ये.
तुर्कस्थानातील भूकंपाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये एका बालकाची सुखरुप सुटका केल्याचे दिसत आहे. बचाव दलाने 22 तासांच्या अथक प्रयत्नानंतर इमारतीच्या मलब्यातून 3 वर्षांच्या बालकास सुखरुप बाहेर काढले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “मालत्या येथे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या 3 वर्षांचा बाळ मीरानला 22 तासांनंतर बाहेर काढण्यात आले आहे.”
बालकास जीवनदान
Malatya’da yıkılan binanın enkazı altında kalan 3 yaşındaki Miran bebek, 22 saat sonra kurtarıldı.#deprem #seferberlik pic.twitter.com/N6fWjT2zPi
— EHA MEDYA (@eha_medya) February 7, 2023
बचावदलाकडून युध्दपातळीवर कार्य सुरु आहे. मलब्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. अशात 3 वर्षांचा बाळ मीरानला 22 तासांनंतर बाहेर काढण्यात आले. बचाव दलाचे कार्य पाहून नागरिक त्यांची प्रशंसा करत आहेत. अनेक लोकांनी सोशल मिडीयावर लहान मुलाला वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. एका यूजरने लिहिले, ‘या चमत्कारासाठी परमेश्वराचे आभार! तो सर्व सुंदर मुलांचे रक्षण करो. मी तुर्कीमधील सर्व पीडितांसाठी प्रार्थना करतो. एका युजरने लिहिले, “मला आशा आहे की तुर्की सरकार भूकंपग्रस्त मुलांची चांगली काळजी घेईल ज्यांचे पालक नाहीत, त्यांचे कोणीतरी पालक व्हा.”
दरम्यान, मुलाचा हा रेस्क्यू व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.