Crime News: खडका एमआयडीसीती ज्वलनशील पदार्थ साठवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

taluka police

Crime News: भुसावळ तालुक्यातील खडका एमआयडीसीत दि. २२ रोजी पोलिसांनी कारवाई करत ९८ लाख ५८ हजाराचा बायोडीझल सदृष्य ज्वलनशील पदार्थाचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी चौकशीअंती ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[metaslider id="6181"]

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, भुसावळ तालुक्यातील खडका एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक १३४ येथे बायोडीझल सारख्या ज्वलनशील पदार्थाचा साठा असल्याची माहती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने कारवाई करत ९८ लाख ५८ हजाराचा बायोडीझल सदृष्य ज्वलनशील पदार्थ जप्त केला होता. या ठीकाणी संशयीत हे ज्वलनशील पदार्थ टँकर क्रं.जी.जे.- २१ टी. ५९४३, एम.एच. ०४ एफ.जे. २०४०, जी.जे.- ०३ डब्ल्यू ८८१० मध्ये साठवून विक्री करण्याच्या इराद्यात होते. कुठलाही परवाना नसताना ही मंडळी हे कृत्य करत होती. त्यानुसार, गुप्त माहीती मिळाल्यावरुन पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाने धाड टाकत कारवाई करत बायोडीझल सदृष्य ज्वलनशील पदार्थ जप्त केला होत. या पदार्थाचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले होते. त्यासंदर्भातील अहवाल आणि चौकशीअंती गुजरात येथील आबीदअली अब्दुल रहेमान अन्सारी, अक्कलपाडा तालुक्यातील मोहपाडा येथील अनेष वसावे आणि गुजरात येथील विलास विजय वळवी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरक्षक प्रकाश वानखेडे करीत आहे.

error: Content is protected !!