Somvar Che Upay: सुखी-समृद्ध जीवनाची प्रत्येकाला अपेक्षा असते. त्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो. मात्र, प्रयत्न करुनह काहींना यश मिळत नाही. आर्थिक समस्यावर मात करण्यासाठूी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले आहे. हिंदू धर्मात भगवान शंकराला (Lord Shankar) ऊर्जेचे रूप मानले जाते आणि ते दुःखांचा नाश करणारे आहेत. सोमवारचा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही उपाय (Monday Remedy) केले पाहीजे. भगवान शंकराची कृपा व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर सोमवारी सायंकाळी काही विशेष उपाय केले पाहिजे. आजचा हा लेख त्याच विषयावर आहे. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सोमवारच्या उपायांविषयी माहिती.
करा हे उपाय
- उपासना – सोमवारी भगवान शंकराची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. निर्धारित वेळेत नियमितपणे भगवान शिवाची पूजा करावी.
- मध – सोमवारी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला मध अर्पण करा. असे केल्याने नोकरी-व्यवसायातील समस्या दूर होतात.
- चंदनाचा तिलक – चंदना हे शीतल आहे. शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही.
- गंगाजल – भगवान शंकराचा आर्शिवाद हवा असेल तर सोमवारी सायंकाळी व मंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे. यासोबत ‘ओम नमः शिवाय’ चा जप करावा. तुम्हाला सुख-समृद्धी प्राप्त होईल.
- नैवेद्य – भगवान शंकराची पूजा करताना अक्षत, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
- साजूक तुपाचा दिवा – परिश्रम करूनही आर्थिक अडचण येत असेल तर सोमवारी रात्री शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा. हा उपाय 41 दिवस नियमित करा. असे केल्याने शिवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)