Mustard Oil Benefits: निद्रानाश म्हणजेच झोप न लागणे किंवा व्यवस्थित झोप न येणे. सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना ही समस्या निर्माण होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी अनेकजण महागडे उपचार घेतात. मात्र, तुम्हाला माहत आहे का? तुम्ही घरच्या घरी या समस्येवर मात करु शकता. अश्चर्य वाटलणं? पण हे खंर आहे. आयुर्वेदात (Ayurveda Tips) अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या रामबाण ठरतात. त्यानुसार जाणून घेऊया निद्रानाशाच्या समस्येवर आयुर्वेदात काय आहे उपाय.
झोप न लागण्याच्या समस्यावर आयुर्वेदात मोहरीच्या तेलाचा विशेष उपाय सांगण्यात आला आहे. आरोग्यासाठी फायदेशीर असलेले मोहरीचे तेल जवळपास प्रत्येक स्वयंपाक घरात आढळून याते. मोहरीच्या तेलाचा अनेक प्रकारे वापर केला जातो आणि हे तेल आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. मोहरीच्या तेलात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, मिनोअन सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस्, ओमेगा-3, 6 हे घटक भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे मोहरीच्या तेलाने शरीराची मसाज केल्याने खूप फायदा होतो. लहान मुलांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने त्यांची हाडे मजबूत होतात. यासह डोक्याला मसाज केल्याने डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. वृद्धांच्या सांधेदुखीत देखील आराम मिळतो. यासह त्वचेचा कोरडेपणा दूर होतो, केसांना मजबुती देण्यातही मोहरीचे तेल फायदेशीर ठरते. यासह मोहरीच्या तेलामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्म आढळतात, जे किरकोळ जखमांवर औषध म्हणून प्रभावी ठरतं.
तणाव
धावपळीचं युग त्यात चुकीची जीवनशैली यामुळे लोकांमध्ये तणाव, चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्या वाढत आहेत. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तळपायांना मोहरीचे तेल लावा आणि रोज मसाज करा, असे केल्याने तुम्हाला लाभ मिळेल. तसेच तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी अयोग्यदायी जीवनशैली स्विकारा.
रक्ताभिसरण
शरीराला मसाज करण्यासाठी मोहरीचे तेल वापरणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. शरीरातील रक्ताभिसरण योग्य रीतीने झाल्यास सर्व अवयवांमध्ये पोषक घटक पोहोचतात आणि रक्तप्रवाहही चांगला होतो. यासोबतच नसामधील ब्लॉकेज दूर करण्यासही मोहरीचे तेल प्रभावी ठरते.
निद्रानाश (झोपेची समस्या)
सध्या इंटरनेटच्या या युगात रात्री नीट झोप न येण्याची समस्या अनेकांना भेडसावत आहे. तुम्हालाही रात्री व्यवस्थित झोप येत नसेल तर मोहरीचे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी फक्त 10-15 मिनिटे तळपायाला मोहरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे थकवा दूर होत तुम्हाला शांत झोप येण्यास मदत होईल.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)