Chhavi Pandey : छोट्या पडद्यावरील टॉप शो ‘अनुपमा’ (Anupamaa) मालिकेतील एक नाव सध्या चर्चेत आहे. होय तुम्ही बरोबर ओळखलं.. ‘माया’, या मालिकेतील अनुपमा आणि अनुज कपाडिया यांच्या नात्यातील आनंदाला पूर्णविराम देणारं ‘माया’ हे पात्र चांगलचं लाइमलाइटमध्ये आलं आहे. अभिनेत्री छवी पांडे (Chhavi Pandey) ही मायाची भुमिका साकारत आहे. छवी बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. ती अभिनयाप्रमाणे सध्या तीच्या संपत्तीमुळे चर्चेत आली आहे. त्यानुसार जाणून घेऊया किती कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे छवी पांडे.
इंडस्ट्रीत येण्याआधी करायची सरकारी नोकरी
अभिनेत्री छवी पांडे ही अभिनय क्षेत्रात येण्याआधी सरकारी नोकरी करत होती. यासह ती एक चांगली गायिका देखील आहे तिने अनेक स्पर्धांमध्ये तिच्या आवाजाच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केल आहे. तिचे गायन कौशल्य पाहून लालू प्रसाद यादव यांनी तिला सरकारी नोकरीची ऑफर दिली आणि अभिनेत्रीने बरीच वर्षे कामही केलं. मात्र,गायिका होण्यासाठी वडिलांच्या सांगण्यावरून छवी मुंबईत आली होती. एके दिवशी तिने टीव्हीसाठी ऑडिशन दिले आणि निवड होत ती अभिनेत्री बनली.
छवी पांडेच्या मालिका
छावी पांडेने ‘सजदा तेरे प्यार में’ या टीव्ही शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ती ‘संग मेरे डोल तू’ मध्ये दिसली, ही मालिका वर्षभरातच बंद झाली. ‘दाग’मध्येही ती दिसणार होती, पण शेवटच्या क्षणी संजीदा शेखला तिची भूमिका मिळाली. छवीला खरी ओळख ‘एक बूंद इश्क’मधून मिळाली. तिने ‘सिलसिला प्यार का’, ‘काल भैरव रहस्य’ आणि ‘विक्रम बैताल की रहस्य गाथा’ सारख्या शोमध्येही काम केले आहे.
इतकी आहे एकूण संपत्ती
मूळ बिहारमधून आलेली अभिनेत्री छवी पांडे गेल्या एक दशकाहून अधिक काळ इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली तेव्हा ती मध्यमवर्गीय होती, आज ती रॉयल लाईफ जगते. रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती 2 मिलयन ते 5 मिलियन डॉलर इतकी आहे.