Bhusawal News: भुसावळ शहरातील खडका रोड परीसरातील बहारे मदीना मश्जिदजवळ एकाच रात्री एकाच परीसरात 3 ठीकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या धाडसी घरफोड्या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी माहीती अशी की, मो. आशिक मो. हनिफ पिंजारी यांनी भाड्याने देण्यासाठी शहरातील खडका रोड परीसरातील बहारे मदीना मश्जिदजवळील काही घरे बांधली आहे. या ठीकाणी इमरान शाह इकबाल शाह, इब्राहम सलीम शाह, मो. इब्राहीम अब्दुल शकील हे तीन भाडेकरु राहत आहे. दरम्यान दि. 25 जानेवारीच्या रात्री ते 26 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेच्यादरम्यान अज्ञात चोरट्याने तीघ भाडेकरुंच्या घराचा कडीकोयंडा तोडून इब्राहम सलीम शाह व मो. इब्राहीम अब्दुल शकील यांच्या घरातून सोन्याची अंगठी, सोन्याचे मणी, लहान मुलाच्या हातात घालायची सोन्याची मनगटी, चांदीचे दागिणे असा एकूण 55 हजार 600 रुपयांचा ऐवज तसेच इमरान शाह इकबाल शाह यांच्या घरातून 15 हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिणे लंपास केले. दरम्यान, सकाळी घरफोडी झाल्याचे लक्षात येताच परीसरात खळबळ उडाली. घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मो. आशिक मो. हनिफ पिंजारी यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र पाटील करीत आहे.
खडकारोड परीसर ठरतोय चोरट्यांचे टार्गेट
गेल्या महीनाभराच्या कालावधीतील घटनांचा विचार केला असता चोरट्यांनी खडकारोड परीसराला टार्गेट केलयं की काय असं दिसून येत आहे. सातत्याने या परीसरात घरफोड्या होत आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची वाढवत चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरकांकडून करण्यात येत आहे.