अहिल्यानगर दि. 14 मार्च (हिं.स) :- संतांचे विचार अंगीकारून वाचन संस्कृती जोपासत चांगल्या गोष्टीचे श्रवण केले पाहिजे.समाजामध्ये वावरत असताना चांगल्या कामातूनआपल्या जीवनातील काळ सार्थ करा.परमार्थ हा एकट्या दुखट्याने करता येत नसतो तर तो सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात व आनंदा त साजरा करावा.माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त गेल्या २६ वर्षां पासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करीत असून अक्षरशा सावेडी गावामध्ये अवतरले पंढरपूर हा धार्मिक उत्सव पहावयास मिळत आहे.संप्रदायाकडे वळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून ती वाढविण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन ह.भ.प भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांनी केले.
सावेडी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यामध्ये ह.भ.प भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांचे कीर्तन संपन्न झाले.यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर,ह.भ.प संदीप महाराज खोसे,चंद्रकांत महाराज बारस्कर,ह.भ.प विठ्ठल महाराज फलके,बाळासाहेब वाकळे,पुष्कर कुलकर्णी आदींसह ग्रामस्थ भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावेडी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले असून यानिमित्त गुरुवार दिनांक १३ रोजी सकाळी ९ वाजता संत संमेलनाचे आयोजन केले असून सावेडी गावां मधून टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे.तरी सर्व भक्त गणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.तसेच कीर्तन सोहळ्यामध्ये दररोज लकी ड्रॉ चे आयोजन केले असून ३ महिलांना पैठणी साडी देण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या वतीने दररोज महाप्रसादाचे आयोजन केले असून स्वच्छतेच्या दृष्टीने घरून येताना ताट-तांब्या आणावे असे आवाहन ह.भ.प संदीप महाराज खोसे यांनी केले.