अवैध सावकारी, नाशिकच्याच दाम्पत्यावर ‘मकोका’
Illegal moneylending, ‘MCOCA’ on Nashik couple
अवैध सावकारी करुन कर्जदारांना दमदाटी, पोलिसांनी फास आवळला, वैभव-शलाका देवरेवर ‘मकोका’ तसेच पंधरा गुन्हे नोंद असलेल्या देवरेसह त्याची पत्नी आणि शालकाची मकोकाअन्वये झाडाझडती घेतली जाणार आहे. वैभव यादवराव देवरे याच्या टोळीतील सदस्य व देवरे याची पत्नी सोनल, गोविंद पांडुरंग ससाणे व निखिल नामदेव पवार अशी संशयितांची नावे आहेत.
नाशिक शहरात अत्यंत निर्दयीपणे सावकारी करून वसुलीच्या नावाखाली कर्जदारांना जेरीस आणणारा अवैध सावकार वैभव देवरे याच्यासह त्याला साथ देणाऱ्यांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील अन्य मुजोर अवैध सावकारांचे धाबे दणाणले असून, अशा सावकारांची माहिती द्या, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.
या वेळी त्यांनी मकोकाअंतर्गत कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे पंधरा गुन्हे नोंद असलेल्या देवरेसह त्याची पत्नी आणि शालकाची मकोकाअन्वये झाडाझडती घेतली जाणार आहे. वैभव यादवराव देवरे याच्या टोळीतील सदस्य व देवरे याची पत्नी सोनल, गोविंद पांडुरंग ससाणे व निखिल नामदेव पवार अशी संशयितांची नावे आहेत. या संशयितांच्या मदतीने देवरे याने गुन्हेगारी टोळी निर्माण करून संघटितरीत्या आर्थिक फायद्याकरिता इंदिरानगर, अंबड, गंगापूर, मुंबई नाका परिसरात लोकांची फसवणूक करून अवैध सावकारी केल्याचा प्रकार पुढे आला होता.
लोकांना व्याजाने पैसे देऊन त्यापोटी अवाजवी व्याजाची रक्कम वसूल केली जात होती. ही वसुली करताना दमदाटी, विनयभंग, ठार मारण्याची धमकी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीद्वारे वसुली करून त्याने दहशत निर्माण केली होती. देवरेवर एप्रिल २०२४ मध्ये खंडणी व अवैध सावकारीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पाठोपाठ तब्बल १४ गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्याच्यावर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ चे (मकोका) कलम ३(१) (ए), ३(२), ३(४), ३(५) ही वाढीव कलमे लावून कारवाई करण्यात आली आहे.
वैभव देवरेसह त्याच्या टोळीतील सदस्यांनी हिरावाडी येथील जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती खरे असल्याचे भासविले. सारूळ येथील जमिनीच्या व्यवहारापोटी ६३ लाख ४९ हजार रुपये घेऊन जमीन नावावर केली नाही. तसेच तक्रारदाराकडून सावकारी व्यवसायासाठी पत्नी सोनलच्या बँक खात्यावर ३५ लाख बळजबरीने घेतले. तसेच विनयभंगाची खोटी तक्रार करण्याची आणि ठार मारण्याचीही धमकी दिली.