उचंदा येथे कानिफनाथ महाराज यात्रोत्सव संपन्न
प्रक्षाळ पूजा, अभिषेक व महाआरती….
Kanifnath Maharaj pilgrimage festival concludes at Uchanda
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे नाथ संप्रदायाच्या आराध्य दैवत श्री कानिफनाथ महाराजांचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. दिनांक २२ मार्च रोजी यात्रोत्सवाची मुख्य मिरवणूक व धार्मिक विधी पार पडले.
यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी, पारंपरिक प्रथेप्रमाणे श्री कानिफनाथ महाराजांचा थकवा क्षीणभाग घालवण्यासाठी प्रक्षाळ पूजा, अभिषेक व महाआरती उत्साहात पार पडली. या विशेष महाआरतीचा मान मंदिराचे भगत धोंडू महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी मोठ्या संख्येने नाथ भक्त उपस्थित होते. तसेच जितेंद्र भोलाणे, छबिलदास पाटील, गणेश भोलाणे, विक्रम ठाकरे, रवींद्र पाटील, विकी ठाकरे, राजू सोनार, रामकृष्ण ठाकरे, निवृत्ती कचरे, गोपाळ पाटील, रामभाऊ कचरे, डी. के. भोलाणे आदींची उपस्थिती उल्लेखनीय होती.
या यात्रोत्सवामुळे नाथ संप्रदायाच्या परंपरांचे दर्शन घडले असून, भाविकांनी मोठ्या श्रद्धेने कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेऊन यात्रा संपन्न केली.