Sunday, July 6, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

अवधान लघुपटाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Admin by Admin
April 3, 2025
in महाराष्ट्र
0
अवधान लघुपटाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनने अध्ययन अक्षमता या विषयावर निर्मित केलेल्या “अवधान” या लघुपटाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय निवासस्थान सिंहगड, मुंबई येथे करण्यात आले.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, हशु अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अस्मिता हुद्दार, सहयोगी प्राध्यापक डॉ. गायत्री शिरूर, डॉ. अमित मिसाळ, सहाय्यक प्राध्यापक निशा कुट्टी, पुनम मिश्रा, उत्तमचंद लेहरचंद ट्रस्ट फाउंडेशनचे कबीर भोगीलाल,निखिल पाटील उपस्थित होते.

“अवधान” या लघुपटाच्या माध्यमातून अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांना मिळणारे शिक्षण, तसेच समाजाची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

यामध्ये अध्ययन अक्षमतेची लक्षणे काय आहेत ती समजून घेऊन मुलांच्या विकासावर लक्ष ठेवणे कसे गरजेचे आहे. याबाबतीत जनजागृती करून शिक्षक, समाज व पालक यांना अध्ययन अक्षमतेची शंका कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करणारी ही फिल्म असून या ॲनिमेटेड फिल्म साठी जेष्ठ कलावंत नाना पाटेकर यांनी आवाज दिला आहे.

याप्रसंगी विद्यापीठामध्ये दिव्यांग केंद्र निर्माण करण्यासंदर्भात सर्वसमावेशित चर्चा करण्यात आली.

Previous Post

रमजान ईद हा बंधूभाव व मानवतेचा संदेश – बाळासाहेब थोरात

Next Post

भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा; DJ वजा शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Admin

Admin

Next Post
भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा; DJ वजा शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा; DJ वजा शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group