भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा; DJ वजा शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
काय घडले ? जेव्हा मुक्ताईनगरच्या श्रीराम नवमी शोभायात्रेत DJ ला मारले फाट्यावर
पूर्ण व्हिडिओ बातमी पहा मुक्ताई वार्ता युट्यूब व फेसबुक प्लॅटफॉर्म वर..
मुक्ताईनगर – येथील श्रीराम नवमी उत्सव यंदा अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. DJ वाजवण्याऐवजी टाळ, मृदंग, वारकरी भजनी मंडळ आणि मैदानी खेळ सादरीकरणाच्या माध्यमातून शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
उत्सवाची सुरुवात श्रीराम मंदिरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालेल्या महाआरतीने झाली. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. ही भव्य शोभायात्रा श्रीराम मंदिर ते भुसावळ रोड, पोलिस स्टेशन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ते प्रवर्तन चौक या मार्गावरून पार पडली.
शोभायात्रेमध्ये अनेक ठिकाणी महिलांनी प्रभू श्रीरामांच्या पालखीचे पूजन केले. विविध रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या वेशात साकारलेल्या बालिकांचे पूजन करत नागरिकांनी आपली श्रद्धा व्यक्त केली. वारकऱ्यांच्या भजन-कीर्तनामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
उत्सव यशस्वी करण्यासाठी राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष, रामभक्त आणि राम रोटी आश्रमचे विश्वस्त यांनी विशेष परिश्रम घेतले.
फेसबुकवरचे ‘कट्टर’ श्रीराम भक्त प्रत्यक्षात शोभायात्रेत दिसेनात ?
दरम्यान, सोशल मीडियावर सदैव हिंदूंना जागे राहा असे सांगणारे, ‘झोपलेले हिंदू’ म्हणत टीका करणारे कट्टर श्रीराम भक्त मात्र प्रत्यक्ष उत्सवात कुठेच दिसून आले नाहीत. यामुळे अनेक खवळलेल्या हिंदू बांधवांनी सोशल मीडियावर त्यांच्या ‘दुहेरी भूमिके’ची खिल्ली उडवली आहे.