अहिल्यानगर दि. 31 मार्च ( हिं. स.) : भारतामध्ये विविध धर्म – पंथ – जात असूनही मानवता धर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारे आहे. रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो. जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि पवित्र भावनेने हा सण साजरा करतात. यामध्ये देशातील सर्व धर्मीय सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभाव व मानवधर्माचा संदेश देणारा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर मधील ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आ.डॉ.सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात, विश्वासराव मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, गणेश मादास,किशोर कालडा आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्या चा मार्ग असल्याचे सांगितले आहे. उपवासाने जीवनातील पवित्रता वाढते. रमजान महिना हा आनंददायी व प्रेरणा देणारा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विविधता असून सर्व धर्म समभावामुळे सर्व नागरिक एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतात. आपल्या देशाची ताकद आहे. रमजान ईद हा सन संपूर्ण जगामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने मुस्लिम बांधव साजरा करत असून बंधू भावाचा प्रेमाचा आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण आहे.सर्वधर्मसम भाव व मानवताधर्म वाढल्याने देशाची खरी ताकद वाढणार असून प्रगती होणार असल्याचे ते म्हणाले.माजी आ.डॉ.तांबे म्हणाले की, रमजान ईद हा सन जगासह भारतात मोठ्या आनंदाने साजरा करतात. यानिमित्त महिनाभर उपवास केले जातात. ईश्वराजवळ राहण्याचा उपवास हा मार्ग असून अंतकरणाच्या शुद्धीसाठी पवित्र उपवास केले जातात.रम जान ईद निमित्ताने सर्व बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, भारतामध्ये अनेक धर्म पंथ आहे.सांस्कृतिक विविधता ही देशाची परंपरा आहे. जात ,धर्म,पंथ वेगळे असले तरी भारतीय म्हणून सर्वजण एकत्र येऊन सण साजरे करत असतात. आणि हीच खरी देशाची ताकद असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी संगमनेर शहरातील मुस्लिम बांधव, इतर सर्व धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.