Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Chanakya Niti: पत्नीच्या अंगी असलेल्या या 4 गुणांनी पती ठरतो भाग्यवान, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती  

Admin by Admin
January 20, 2023
in लाईफस्टाईल
0
Chanakya Niti: पत्नीच्या अंगी असलेल्या या 4 गुणांनी पती ठरतो भाग्यवान, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती  
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Chanakya Niti: जगातील महान विचारवंतांमध्ये आचार्य चाणक्य (Arya Chankya) यांचा समावेश होतो. त्यांनी कूटनीती, राजकारण, अर्थशास्त्र याशिवाय व्यक्तीच्या व्यावहारिक जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहे. नाते-संबंधावर (Relationship Tips) त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगीतल्या असून त्यांनी आपल्या नातिशास्त्रात सुखी वैवाहिक (Married Life Tips) जीवनासाठी पती-पत्नीच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे या विषयी देखील वर्णन केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अशा पुरुषांना भाग्यवान म्हटले आहे ज्यांच्या पत्नींमध्ये विशेष गुण असतात. चला तर जाणून घेऊया महिलेच्या अंगी असे कोणते विशेष असले पाहिजे, ज्यामुळे त्या महिलेचा पती भाग्यवान म्हणून ओळखला जातो.

संयम

चाणक्य नीतीनुसार ज्या पुरुषाची पत्नी संयमी स्वभावाची असते असे पुरुष खरोखर खूप भाग्यवान असतात. या महिला कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जात पतीसोबत खंबीरपणे उभे राहतात. या महिला योग्य आणि अयोग्य यातील फरक सहज ओळखू शकतात. कोणताही निर्णय संयमाने आणि योग्य प्रकारे घेणे हे त्यांचं वैशिष्ट्य असतं असं चाणक्य नीत सांगते.

चांगली वागणूक

अशी स्त्री जी आपल्या नातेवाइकांमध्ये आणि समाजात चांगले वर्तन करते. सर्वांशी आदराने वागत कुटुंबाला एकत्र ठेवण्यसाठी आणि कुटुंबात गोडवा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते. अशा महिलांच्या घरात ज्येष्ठांचा आशीर्वाद कायम राहतो.

बचत करणारी महिला

पैशांची बचत ही कठीण काळात उपयोगी ठरते. चाणक्य नीतिनुसार ज्याची पत्नी पैशाची बचत करते ते पुरुष भाग्यवान आहेत. कारण ज्या महिलेला पैसे कधी खर्च करायचे आणि पैशांची केव्हा बचत करावी तसेच अनावश्यक खर्च कसा टाळावा हे माहित असते ती महिला परिवाराचा मोठा आधार असते. कारण अशा महिला परिवाराला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका पार पडतात.

चांगले बोलणे

बोलण्यावरून व्यक्तीची ओळख होत असते. गोड बोलणारी व्यक्ती कोणालाही आपलंस करून घेतात. अशा महिला कोणाला दुखावत नाहीत. त्यामुळे त्यांना नेहमी चांगला आशीर्वाद मिळतो. बोलण्यासह या महिलांचे आचरण देखील शुद्ध असते. अशा महिलांचे पती भाग्यवान मानले जातात.

(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Tags: Acharya Chanakya Niti For MoneyAcharya Chankya NitiChanakya NitiChanakya Niti for Happy lifeChanakya Strategies
Previous Post

Indian Army Recruitment 2023: भारतीय लष्करात नोकरीची सुवर्ण संधी, “या” पदांसाठी होईल भरती

Next Post

IND vs NZ: ICC चा टीम इंडीयाला झटका, ठोठावला इतका दंड

Admin

Admin

Next Post
IND vs NZ: ICC चा टीम इंडीयाला झटका, ठोठावला इतका दंड

IND vs NZ: ICC चा टीम इंडीयाला झटका, ठोठावला इतका दंड

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group