Indian Army Recruitment 2023: भारतीय लष्करात (Indian Army ) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कर शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरतीसाठी (Indian Army Recruitment) इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 9 फेब्रुवारी 2023 रोजी नोंदणी बंद होईल. एकूण 93 रिक्त पदांसाठी ही भरतीप्रक्रीया राबविण्यात येत आहे.
![Simply Easy Learning](https://i0.wp.com/muktaivarta.com/wp-content/uploads/2024/05/Blue-and-White-Modern-We-Are-Hiring-Flyer_20240518_215836_0000.jpg?resize=1600%2C1069)
एकूण रिक्त जागा
एसएससी (टेक): 61 पुरुष
एसएससीडब्ल्यू (टेक): 32 महिला
शैक्षणिक पात्रता
एसएससी (टेक): या पदासाठी उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार एसएससीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
एसएससीडब्ल्यू (टेक): SSCW म्हणजे नॉन टेक्निशियन या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि तांत्रिकसाठी कोणत्याही अभियांत्रिकी प्रवाहात B.E/B.Tech पदवी प्राप्त असावा.
यासह उमेदवाराचे 1 ऑक्टोबर 2023 रोजी एसएससी टेकसाठी वयोमर्यादा 20 ते 27 वर्षे आणि विधवांसाठी कमाल 35 वर्षे आहे. पुढे, निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग, SSB मुलाखत आणि स्टेज-2 यांचा समावेश असेल. स्टेज-2 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय परीक्षेसाठी हजर राहावे लागेल.
या पदांसाठी इच्छूक अभियांत्रिकी पदवीधर असलेले पात्र आणि इच्छुक अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिलांनी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देत अर्ज करू शकतात. याशिवाय भारतीय सशस्त्र दलातील संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवाही यात सहभागी होऊ शकतात.