संत मुक्ताई पालखी गुरुपौर्णिमेला विठ्ठल -रुक्मिणी भेट – पंढरपुरात भक्तीचा महासागर
🟡 SEO Meta Discription
गुरुपौर्णिमेला मुक्ताई पालखीने विठ्ठल व रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. गोपाळकाला, अभंग गायन, भक्तीमय वातावरण – वाचा संपूर्ण घटना पंढरपूरातून!

गुरुपौर्णिमा… भक्तीचा सर्वोच्च दिवस! आणि याच पवित्र दिवशी, पंढरपूरात संत मुक्ताई माऊलींच्या पादुकांनी घेतलेली विठ्ठल व रुक्मिणी मातेची भेट हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. आषाढी वारीनंतर गोपाळकाला कार्यक्रमाच्या निमित्ताने गोपाळपूर येथे संतांच्या भेटीनंतर, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांचं झालेलं काल्याचं कीर्तन, भावपूर्ण अभंगगायन आणि परतीच्या प्रवासाच्या वेळी म्हटलेला निळोबारायांचा अभंग — यामुळे पंढरपूरचा संपूर्ण परिसर भक्तीने न्हाऊन निघाला.

जळगाव जिल्ह्यातील श्री.संत मुक्ताई समाधी स्थळ कोथळी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून दिनांक ६ जून २०२५ रोजी आषाढी वारीनिमित्त श्री.संत मुक्ताबाई पालखी सोहळा श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा सर्वांत लांबचा असलेला हा पालखी सोहळा दिनांक ३ जुलै २०२५ रोजी पंढरपुरात पोहोचला होता. यानंतर नित्य भजन ,कथा, किर्तन असे नित्योपचार आटोपल्यावर आज दिनांक १० जुलै २०२५ गुरुवारी, गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर गोपाळकाला येथे संत भेटी व काल्याचे किर्तन आटोपल्यावर पुन्हा श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन विठ्ठल भेटीसाठी आलेल्या संत मुक्ताई माऊलींच्या पादुका रूक्मिणी मातेच्या भेट घेतली. दुपारी नैवेद्य – जेवण होऊन पालखीने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली .
यावेळेस निळोबारायांचा पुढील अभंग किंवा अशा अर्थाचा अभंग म्हटला गेला.

“पंढरीहूनि गावा जाता । खंती वाटे पंढरीनाथा ।।
आता बोळवीत यावे । आमुच्या गावा आम्हांसवें ।।
सदगदित कंठ । फुटो पाहे हृदय ।।
निळा म्हणे पंढरीनाथा । चला गावा आमुच्या आता ।।”
यावेळेस अनेक पंढरपूरकर इतर पालख्यांसह संत मुक्ताई पालखीला देखील निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले होते.
जाणून घेऊया पंढरपूर येथील गोपाळपूर महत्व
पंढरपूर मुक्काम व गोपाळकाला
आषाढ शुद्ध दशमी ते आषाढ शुद्ध चतुर्दशी पालख्यांचा मुक्काम पंढरपूरात असतो . पंढरपूर मुक्कामी रोज सकाळी पादुकांची पूजा , सकाळ – संध्याकाळ कीर्तन व रात्री जागर (रात्रभर केले जाणारे भजन ) होतो .
द्वादशीच्या दिवशी सकाळी उपास सोडतात. रात्री कीर्तनानंतर खिरापत होते. द्वादशीला काही पालख्यांतर्फे मंदिरात देवाला नैवेद्य जातो.
त्रयोदशी , चतुर्दशी सुद्धा वरीलप्रमाणे कार्यक्रम होतात.
गोपाळपूर काला
वारकरी परंपरेत सर्व उत्सवांची सांगता गोपाळकाल्याने होते. आषाढी वारी सुद्धा याला अपवाद नाही. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पालख्या गोपाळपूरला काल्यासाठी जातात. गोपाळपूरला जाताना काही पालख्या पुन्हा एकदा चंद्रभागा स्नानासाठी थांबतात. कार्तिकी वारीची समाप्ती सुद्धा कार्तिक पौर्णिमेला काल्याने होते.

गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून २ किमी अंतरावर आहे . या ठिकाणी टेकडीवर भगवान गोपाळकृष्णाचे मंदिर आहे . विविध दिंड्या व पालख्या पहाटे पासून या ठिकाणी येऊन काला करतात . पालखी या ठिकाणी आल्यावर गोपाळपूर परिसरात ठरलेल्या ठिकाणी थांबतात . पालखीसमोर काल्याचे कीर्तन होते . त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होते. यानंतर पालखी पुन्हा पंढरपुरात परत येते .
काला गुरुपौर्णिमेला का करतात ?
आषाढी वारीचा काला आषाढ पौर्णिमेला व कार्तिकी वारीचा काला कार्तिक पौर्णिमेला होतो. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असते. दोन्ही कार्यक्रम एका दिवशी येतात. पण गुरुपौर्णिमा व काल्याचा तसा संबंध नाही. कधी कधी दोन पौर्णिमा येतात, तेव्हा गुरुपौर्णिमा एका दिवशी व काला दुसऱ्या दिवशी होतो.
वारीची परिपूर्ती नेमकी कशामध्ये ?
या लेख निमित्ताने अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे कि, सर्व वारकऱ्यांना मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन होत नाही तरी मग वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळते का ?
वारी हे जसे साधन आहे तसेच एकप्रकारे साध्य सुद्धा आहे. वारकरी वारीमध्ये समविचारी लोकांसमवेत भजन करत जाण्याचा आनंद लुटतात. वारीमधील आनंद हेच वारीचे महत्वाचे लक्ष्य आहे. पंढरपुरात पोचल्यावरसुद्धा आषाढी एकादशीचा मुख्य आचार म्हणजे – चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा व भजन कीर्तन आदी कार्यक्रम हा आहे.
बहुतेक ठिकाणी वारीचा उल्लेख विठोबाची वारी असा न होता पंढरीची वारी असाच केला जातो.
वारीच्या काळात देव वाळवंटात ( चंद्रभागेच्या किनारी असलेला वालुकामय प्रदेश ) असतो. व कळस दर्शन झाले तरी पुरेसे आहे अशी वारकऱ्यांची समजूत आहे.
पंढरपुरात देव कोठे आहे याचे वर्णन करणारा संत जनाबाईंचा अभंग प्रसिद्ध आहे.
संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होतो ।।
तेथे असे देव उभा । दिसे (जैसी) समचरणाची शोभा ।।
त्यामुळेच पालखी सोहळा सुरु होवून दोनशेहून अधिक वर्षे झाली तरी पालखी विठ्ठल मंदिरात दर्शनास नेण्याची पध्द्त नव्हती. आता गेल्या वीस वर्षात ही पध्द्त सुरु झाली आहे.
वर लिहिल्याप्रमाणे नवीन प्रथेनुसार पौर्णिमेला पालख्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जातात.














