धक्कादायक! मुक्ताईनगरमध्ये पुन्हा एक अपघात; शिवसेना उपतालुकाप्रमुख बालकासह थोडक्यात बचावले!
मुक्ताईनगर (ता.१० मे) –
इंदूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे मुक्ताईनगर शहरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून, शनिवारी पुन्हा एक धक्कादायक अपघात घडला. शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील हे आपल्या लहान बाळासह दुचाकीवर जात असताना भरधाव अवजड वाहनाने कट मारल्याने त्यांचा अपघात झाला. सुदैवाने दोघे किरकोळ जखमी झाले.
मुख्य मुद्दे :
- इंदूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक मूळ मार्गाऐवजी मुक्ताईनगर शहरातून वळवली जात आहे.
- यामुळे अनेक गंभीर अपघात; लहान बालकाचा अंबिका ज्वेलर्सजवळ दुर्दैवी मृत्यू.
- महिला, शालेय विद्यार्थी आणि पादचारी यांना होतोय जीवघेणा धोका.
- नागरिकांची सतत मागणी असूनही प्रशासन आणि पोलिसांकडून दुर्लक्ष.
- आज घडलेला अपघात भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचा इशारा!
- मागील काळात नगरपंचायत कर्मचारी मयूर महाजन यांना देखील भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने उडविले होते त्यात त्यांचा मृत्यू झाला होता .
- तर नुकतेच सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या अनिल बोदडे यांना देखील भरधाव अवजड वाहतुकीने गंभीर जखमी केले होते .
- अनेक शालेय विद्यार्थ्यांना देखील या अवजड वाहतुकीने अपघात ग्रस्त करून कायमचे अपंगत्व दिलेले आहे.
अपघाताची सविस्तर माहिती :
आज शनिवार, दिनांक १० मे २०२५ रोजी सकाळी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील हे आपल्या लहान बाळाला घेऊन दुचाकीने जात होते. रेस्ट हाऊस समोरील ललित रेडिमेड दुकानाजवळ एक भरधाव ट्रकने अचानक कट मारल्याने दुचाकीवरील ताबा सुटून ते खाली पडले. सुदैवाने दोघेही किरकोळ जखमी होत थोडक्यात बचावले. तर त्यांची दुचाकी चे मोठे नुकसान झाले.
प्रशासनाला इशारा :
या घटनेनंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे शहरातून होणारी अवजड वाहतूक तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर वेळेवर उपाययोजना झाली नाही, तर नागरिकांच्या सहभागाने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
नागरिकांची मागणी :
- अवजड वाहतूक तत्काळ कुंड व सुकळी मार्गे वळवावी.
- शहरात वाहनांना प्रवेशबंदीचे कठोर नियम लागू करावेत.
- शाळा, बाजारपेठ व गर्दीच्या भागात वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
- रात्री होणाऱ्या भरधाव वाहतुकीने तसेच त्यांच्या कर्णकर्कश हॉर्न मुळे नागरिकांना होतोय प्रचंड त्रास
हा अपघात शेवटचा ठरावा यासाठी प्रशासनाने जागे व्हावे, हीच नागरिकांची अपेक्षा!