मुक्ताईनगर येथे आरोग्य विषयक कार्यशाळा संपन्न
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग ,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व मुक्ताई ज्येष्ठ नागरिक मंडळ मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आजोजित
मुक्ताईनगर :
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व मुक्ताई ज्येष्ठ नागरिक मंडळ मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर येथे दहा ऑगस्ट रोजी श्री गजानन महाराज मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य विषयक कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन मानव्य विद्या शाखा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राचार्य डॉक्टर प्रमोद पवार यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी फेसकॉम खानदेश प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष जगतराव बारकू पाटील होते. विशेष उपस्थिती म्हणून जगदीश झांजरिया, पी बी चौधरी, डीटी चौधरी, बी एन पाटील, अरविंद पाखले, एस बी महाजन, वसंतराव चौधरी, ना .वी .चौधरी उमवीच्या प्राध्यापिका शितल पाटील, जनसेवा फाउंडेशनच्या मीनाक्षी कोळी यांचे सह मुक्ताईनगर व लोहारा तालुका पाचोरा येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते .
कार्यक्रमात शहरातील हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रवीण पाचपांडे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर पंकज घोगरे, दंतरोगतज्ञ डॉक्टर अमोल चौधरी यांनी उपस्थित जेष्ठ पुरुष व महिला नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुक्ताई ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष आर. टी. जोगी, सचिव तु. ब. पाटील, उपाध्यक्ष आर. व्ही. राजपूत, कोषाध्यक्ष वसंत बोंडे ,कार्याध्यक्ष किशोर पाटील ,सल्लागार डॉक्टर आर एम पाचपांडे, सहचिटणीस रघुनाथ काकडे ,महिला प्रतिनिधी विजया बोंडे यांच्यासह सर्व ज्येष्ठ महिला पुरुष यांनी परिश्रम घेतले