विश्वपट ब्रम्ह दोरा ! संत परंपरेचे संस्कृती जतनाचे संदेश देणारे प्रेरणादायी रक्षाबंधन !!
• मुक्ताईने तिघाही भावंडांना बांधली राखी
• त्र्यंबकेश्वर,आळंदी,सासवड,आपेगाव येथे पार पडला भावनिक सोहळा !
मुक्ताईनगर : हिन्दू धर्म संस्कृती अनेकविध रूढीपरंपरा व्रतवैकल्य यांनी नटलेली आहे.बहिणभावांच नातं घट्ट विणणारा प्रेमाचा धागा असलेला सण रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात परंपरेनुसार साजरा होतो.
संत परंपरेतील संत मुक्ताबाई आपल्या संत भावास निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर,सोपानदेव यांना बालपणात बांधणारी राखीची अतुट प्रेमाचे बंधनाची परंपरा संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर ने आजही सांभाळली आहे.
रक्षाबंधन निमित्त संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र यांनी प्रतिनीधी पाठवून त्र्यंबकेश्वर,आळंदी,सासवड,आपेगाव या समाधीस्थळावर जावून तिघही बंधूना राखी बांधण्यात आली
आज रक्षाबंधन पर्वावर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे मुक्ताई संस्थान चे विश्वस्त श्री संदिप रवींद्र पाटील व सौ.अंकिता पाटील यांनी मुक्ताईची राखी विधीवत पूजनाने माऊलींना बांधली.यावेळी विशाल महाराज खोले, सागर महाराज लाहूडकार,दिपक महाराज,आळंदी देवस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर व भाविक हजर होते.

#रक्षाबंधन_संतांचे , #जतन_संस्कृतीचे
*जपावे बंधनास निरामय भावनेने जसे जपले निवृत्ती,ज्ञानेश्वर, सोपान ,मुक्ताईने ! या पोष्ट ने फेसबूक , व्हॉटस् अप व सोशल मीडियात शुभेच्छा दिल्या जात असल्याने सोशल नेटवर्क च्या आधुनिक बदलातही संत विचार देवाण घेवाण होत असल्याचे दिसून येत आहे