हिंदूच्या होत असलेल्या क्रुर हत्या व हल्ले !
मुक्ताईनगरात सकल हिंदू संघटना यांच्या वतीने मुक मोर्चा
विश्व हिंदु परिषद अंतर्गत बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटना यांच्या नियोजनाने मोर्चाने वेधले लक्ष
मुक्ताईनगर : देशभरात हिंदू समाज सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद सारखे अनेक जिहाद हिंदू समाजावर आक्रमण करीत आहेत. कन्हैय्यालाल व उमेश कोल्हे यांच्या हत्या या जिहादी तत्वानीच केल्या आहेत.
याशिवाय हिंदू मंदिरांची नासधूस करणे, देवी-देवतांवर असभ्य भाषेत टीका-टिपणी करणे , हिंदूंना जीवे मारण्याच्या खुले आम धमक्या देणे हे प्रमाण वाढत चालले आहे. हे प्रकार तात्काळ थांबविण्यात यावे यासाठी आज देशभारत
विश्व हिंदु परिषद अंतर्गत बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजातर्फे मुक मोर्चा काढण्यात आला.याच अनुषंगाने मुक्ताईनगर शहरातही हजारोंच्या संख्येने मुक मोर्चा निघाला होता.
हजारोंच्या संख्येने निघालेल्या मुक मोर्चा यशस्वीतेसाठी विश्व हिंदु परिषद अंतर्गत बजरंग दल जिल्हा सह संयोजक पांडुरंग पर्वते, तालुका संयोजक आकाश बेलदार, विजय पोलाखरे , सचिन शुरपाटणे, सुदर्शन रत्नपारखी, तेजस झांबरे, ओम माळी , प्रथमेश जोगी, शुभम शेळके, रुपेश पालवे, शंकर उबाळे, स्वप्नील सोनवणे, शुभम कार्ल, भावेश बिरारी आदींनी प्रचंड मेहनत घेतली.