यंदा संत मुक्ताई विशेषांक रिंगण चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते प्रकाशन !
मुक्ताईनगर | पंढरपूर : (संतोष मराठे)
‘रिंगण’ संतपरंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक. दरवर्षी वारकरी परंपरेतल्या एका संताची सोप्या भाषेत ओळख करुन देणारा रिंगणचा विशेषांक प्रकाशित होतो. यावर्षी मुक्ताई माऊलींचा विशेषांक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला पहाटे प्रकाशित झाला.
वाचक म्हणतात,मुक्ताई माऊलींचा विशेषांक एकदम भारी झालाय. आपल्या महाराष्ट्रासाठी मुक्ताई माऊलींचे ताटीचे अभंग म्हणजे गीताच. महाराष्ट्र घडवणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना घडवणारी माऊली म्हणजे संत मुक्ताई. याच मुक्ताई माऊलींवरचा ‘रिंगण’चा विशेषांक वाचायलाच हवा असा आहे. नेहमीप्रमाणे सोपी भाषा हे या अंकाचं वैशिष्ट्य. प्रगल्भ वैचारिक मांडणी, उत्तम कला संपादन, नविन लेखकांचा सहभाग आणि ऐतिहासिक संदर्भासह चिकीत्सक लिखाण हे या अंकाचं वेगळेपण आहे.
संपादक सचिन परब यांची मेहनत अंकाच्या पानापानावर जाणवते. अंक दर्जेदार बनावा यासाठीची त्यांची वर्षभराची धडपड काही प्रमाणात यावर्षी मी जवळून अनुभवलीय कारण ते जेव्हा आदिशक्ती मुक्ताई मंदिरात जुनी कोथळी येथे आले होते तेव्हा पालखी सोहळा प्रमुख ह भ प रविंद्र हरणे महाराज व उद्धव महाराज जुनारे यांनी मला व माझी पत्नी किर्तनकार ह भ प दुर्गा मराठे यांना तिथे बोलवून घेतले होते व रिंगण चे संपादक सचिन परब, जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या वंशज अमृताताई मोरे , सासवड चे किर्तनकार अभय जगताप यांची भेट घडवून आणली होती. तेव्हा या अंका विषयी भरपूर काही चर्चा झाली होती. आणि तेव्हा पासूनच या रिंगण ची ओढ लागली होती कारण यात आदिशक्ती मुक्ताई यांचीच महती यंदा असणार होती.
तशा तर मुक्ताई साहेब या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून परंपरे नुसार असतात मात्र यावर्षी रिंगण च्या मुक्ताई माऊलींचा पंढरपुरात शोध घेतलाय. तो शोध घेताना वक्तेबाबांची गोष्ट यात सापडलीय. ती इंटरेस्टींग आहे. त्यासाठी मी जवळपास पस्तीस जणांचे यात मत आहे. इतक्या तळमळीनं काम करावं ही संपादक सचिन परब व टीमची यात चुणूक दिसून येते आणि हे वाटणं, दिसणं ही रिंगणची जादू आहे.
मुक्ताई माऊलींनी ताटीच्या अभंगात संतत्व सांगितलंय. तेच संतत्व जगणाऱ्या सचिन परब यांच्यामुळं रिंगणच्या वर्तुळाचा व सहकारी यांचा आभास होतो. हभप देवदत्त परुळेकर, अभय जगताप, स्वामीराज भिसे आणि अमृता मोरे यांच्यासह रिंगणमित्रांच्या वर्तुळातला प्रेमाचा कल्लोळ अनुभवण्यासाठी रींगण वाचण्याची उत्कंठ इच्छा वाढलीय. अशा या रिंगण ची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते प्रकाशन झाले आहे.