• मुक्ताईनगर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे आढावा बैठक शुक्रवारी घेण्यात यावी !
• आमदार चंद्रकांत पाटील यांची उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी पत्र
मुक्ताईनगर : तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत नागरिकांना धान्य व्यवस्थित ,वेळेवर पोहोचविले जात नाही आहे. त्यातच कुठल्याच पावत्या किंवा तशा स्वरूपाची नोंद असलेले त्यांना दिले जात नाही. त्यामुळे. शासनाने वितरण व्यवस्थेचे आखलेले धोरण न राबविता येथे त्या प्रणालीचा वापर होत नाही आहे. तसेच शासनाने निर्देशित केलेले नियमावलींची पायमल्ली होत असून यामुळे मात्र नागरिकांचे हक्काचे धान्य काळ्या बाजारात जात असल्याची तालुक्यातून ओरड वाढलेली असून तालुक्यातून अनेक तक्रारी धान्य वितरण व्यवस्थेबद्दल होत असून स्वस्त धान्य दुकानातील धान्य थेट काळ्या बाजारात जात असल्याच्या चर्चा होत आहेत.
त्यामूळे येत्या शुक्रवारी दि. १५ जुलै २०२२ रोजी मुक्ताईनगर येथे तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची आपल्या उपस्थिती मध्ये तात्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशा आशयाचे पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपविभागीय अधिकारी, भुसावळ भाग ता.भुसावळ यांना दिले आहे.