युनिक इंटरनॅशनल शाळेचा “खेल की दुनिया में पहला कदम”
क्रिडा स्पर्धेतून बाल-गोपालांनी लुटला विविध खेळांचा आनंद !
बाल वयापासूनच मुलांच्या हातात मोबाईल येत असल्याने या मोबाईलचा अती वापर हा सर्वच पालकांची डोकेदुखी बनला आहे. यामुळे सर्वांना मुलांच्या भविष्याची चिंता सतावू लागलेली आहे. त्यामुळे एक उपक्रम खेळाचा राबवत संत मुक्ताईनगर येथील “युनिक इंटरनॅशनल शाळे”त चिमुकल्यांना विविध खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच खेळांचे महत्व कळावे यासाठी शाळेत क्रीडा स्पर्धा जोमात संपन्न झाली. खेळ म्हणजे मुलांसाठी खूप आनंदाची गोष्ट. मुला मुलींनी रनिंग , बास्केट बॉल, बॉल कलेक्टिंग, वॉटर फिलिंग इन बॉटल, इत्यादी खेळ खेळून विवीध खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. “खेल की दुनिया मे पहिला कदम” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच वेगवेगळे खेळ खेळले. आरोग्य हीच संपत्ती असे आपण नेहमी म्हणत असतो म्हणून मुलांना लहान वयातच वेगवेगळ्या खेळांची ओळख करून देणे महत्त्वाचे ठरते यासाठी युनिक इंटरनॅशनल शाळेत झालेली क्रिडा स्पर्धा नक्कीच लहान मुलांमध्ये खेळाविषयी आकर्षण निर्माण करेल अशा भावना पालकांतर्फे व्यक्त केल्या जात आहे .
प्रसंगी शाळेच्या सर्व शिक्षिका, मुख्याध्यापिका सौ.जयश्री मासुळे मॅडम, संस्थापक अध्यक्ष श्री मासुळे सर उपस्थित होते.