सालाबादप्रमाणे मराठा दिनदर्शिका 2025 जळगाव जिल्हास्तरीय 10 वी आवृत्ती प्रकाशित झाले असून लवकरच जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांच्या घरातील भिंतींवर ही दिनदर्शिका दिसणार असल्याची माहिती दिनदर्शिकेचे दिनदर्शिकेचे प्रकाशक, संकल्पनाकर्ते दिनेश कदम यांनी दिली आहे. तसेच त्यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ,चाळीसगाव, भडगाव, पाचोरा ,पारोळा,एरंडोल, अमळनेर, चोपडा, यावल ,भुसावळ,वरणगाव, रावेर ,जामनेर या सर्व तालुक्यातून मिळालेल्या शुभेच्छा जाहिरात आणि समाज बांधव तसेच उद्योजक , सामाजिक व राजकीय पक्षातील मान्यवर यांनी गेल्या १० वर्षांपासून दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसाद व पाठिंब्याने जिल्हास्तरीय मराठा दिनदर्शिका प्रकाशित होत आहे. याबद्दल दिनदर्शिकेचे प्रकाशक, संकल्पनाकर्ते दिनेश शंकरराव कदम , मुक्ताईनगर यांनी मुक्ताई वार्ता सोबत बोलताना सर्वांचे आभार मानलेले आहे.