*संत मुक्ताईनगर येथे दत्त जयंती सोहळा साजरा*
*श्री.स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात नाम जप यज्ञ गुरुचरित्र पारायण व भव्य शोभा यात्रेने भक्तिमय वातावरण*
*फेसबुक व्हिडिओ लिंक*
https://www.facebook.com/share/v/1J4ymWmzVV/
*युट्यूब व्हिडिओ लिंक*
https://youtu.be/LoMiXdfxpNk
अशाच अपडेट बातम्यांसाठी आपले लोकप्रिय मुक्ताई वार्ता चॅनल युट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मला फॉलो नक्की करा ही विनंती.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषात व स्वामी नामाच्या जयजयकारात मुक्ताईनगर शहरातील जुनेगावातील श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र येथे दत्त जयंती सोहळा जन्म अध्याय पारायण करून तसेच पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच श्री.स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात नाम जप यज्ञ श्री.गुरुचरित्र पारायण सप्ताह तसेच दत्त जयंतीचे औचित्य साधून एस टी डेपोमधील दत्त मंदिर ते प्रवर्तन चौक ते श्री स्वामी समर्थ केंद्र जुनेगाव अशा स्वरूपात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्मिती झाली होती.
गेल्या सप्ताह काळात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गणेश पुजन, पादुका पूजन, अभिषेक, महाआरती, श्री गुरुचरित्र पारायण सांगता ,महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******************
– आकर्षक सजावटीने वेधले लक्ष –
श्री दत्त जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ केंद्रात फुलांची व रांगोळ्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती .
इतर सर्व सेवेकरी बांधव भगिनी यांच्या प्रमाणे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही घेतला शोभा यात्रेत सहभाग तसेच पालखी खांद्यावर घेवून स्वामींच्या चरणी सेवा रुजू केली.