3 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना दिनी, श्री.संत मुक्ताई जन्मोत्सव
श्री.स्वामी समर्थ सेवेकरी व वारकऱ्यांतर्फे श्री. दुर्गा सप्तशती पारायण सेवा सोहळ्याची जय्यत तयारी
संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी पारायण सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे केले आवाहन
दि.3 ऑक्टोंबर 2024 गुरुवार रोजी शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून दि.3 रोजी घटस्थापना असल्याने हा दिवस आदिशक्ती श्री.संत मुक्ताबाई साहेबांचा प्रकट दिन असून हा जमोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात व्हावा म्हणून दरवर्षी प्रमाणे , दिंडोरी प्रणित,श्री.स्वामी समर्थ केंद्र , मुक्ताईनगर व तापी पूर्णा परिसराच्या वतीने हजारो सेवेकऱ्यांतर्फे श्री.संत मुक्ताबाई समाधी स्थळ( कोथळी) श्रीक्षेत्र मुक्ताईनगर (जुने मंदिर) येथे “दुर्गा सप्तशती” पारायण सेवेचे आयोजन करण्यात आलेले असून सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. या पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री.संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज , जूने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज यांच्यासह श्री.स्वामी समर्थ केंद्र सेवेकरी परिवार ,मुक्ताईनगर व तापी पूर्णा परिसर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
तसेच ज्यांना श्री.संत मुक्ताई समाधी स्थळ श्रीक्षेत्र मुक्ताईनगर जूने मंदिर येथे येणे शक्य नाही त्यांनी प्रत्येक गावातील मंदिरात किंवा घरोघरी आई साहेब मुक्ताई यांचा फोटो पूजेसाठी ठेवून श्री.सप्तशती पारायण करून जन्मोत्सव सोहळा साजरा करावा असेही आवाहन करण्यात आलेले आहे.
आदीशक्ती , मुळमाया , ब्रम्हचित्कला,योगमाया ,जगत्त्रयजननी, आई मुक्ताई नवरात्रातील घटस्थापनेच्या शुभदिनी शालीवाहन शके 1201 प्रमाथीनाम संवत्सर,आश्विन शुध्द प्रतिपदा दि.12/10/1279 शुक्रवारी सायंकाळी झाला.ज्या शक्तीचा अवतार मुक्ताबाई रूपाने झाला,तिचे वर्णन श्रीभागवतात दहावे स्कंदात योगमायेचे रूपाने आलेले आहे. दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यका , माया, नारायणी, इशानी, शारदा व अंबिका अशी चौदा नावे श्री महाविष्णूंनी ज्या आदीशक्ती दिलेली आहेत त्या योगमायेचाच “अवतार” म्हणजे श्री संत मुक्ताबाई होत. ती तीन ही देवाची जननी आहे.
————————————
मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी !
आद्यत्रय जननी देवाचीये!!
आदीशक्ती मुक्ताबाई !
दासी जनी लागे पायी !!
मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ!
सर्वत्रा वरिष्ठ मुक्ताबाई!!
————————————
सकल संतानी मुक्ताईचा मुक्त कंठाने गौरव केलेला आहे अशा आदीमायेच्या चरणी नतमस्तक होवू या.
*मुक्ताबाई मुक्ताबाई !मुक्ताबाई मुक्ताबाई!!*
मुक्ताबाई चतुर्विधा ! जो जप करिल सदा!!
तो जाईल मोक्षपदा ! सायुज्य संपदा पावेल!!
————————————
सप्तशती पारायण सेवेने जन्मोत्सव होणार साजरा :
दिंडोरी दरबार प्रणित ,श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील हजारो महिला व पुरुष तसेच युवक व युवती सेवेकऱ्यांनी परम पूज्य गुरुमाऊली श्री.अन्नासाहेब मोरे यांच्या आदेशाने जगत्त्रयजननी आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा जन्मोत्सव तिर्थ क्षेत्र मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताई मंदिरात येणे शक्य नाही.अशा सेवेकऱ्यांनी घरोघरी सप्तशती पारायण करून साजरा करावे . नैसर्गिक आपदा व संकटे यांना दूर करून शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी येणाऱ्या पिकांचे संरक्षण व्हावे अशी विश्वकल्याणाचा संकल्प करण्यात आदिशक्ती मुक्ताई साहेबांना सप्तशती पारायण प्रसंगी साकडे घालण्यात येणार आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य गुरु माऊली यांचे शुभ आशीर्वादाने आदरणीय गुरुवर्य श्री चंद्रकांत दादासाहेब यांच्या आदेशाने अब्जंचंडी पाठ पारायण या सेवेत संकल्पित होऊन नवरात्रानिमित्त व मुक्ताई जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र मुक्ताबाई संस्थान कोथळी जूने मंदिर येथे भव्य श्री दुर्गा सप्तशती ( मुक्ताई अष्टक लावून ) पाठ पारायण यांचे नियोजन करण्यात आलेले आहे
*ठिकाण… श्रीक्षेत्र मुक्ताबाई संस्थान कोथळी तालुका मुक्ताईनगर*
*दिनाक… 03//10/2024 रोज गुरुवार
*वेळ… सकाळी 10/30 वाजता*
साहित्य…
श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ, नित्यसेवा, जपमाळ, आसन,पाण्याची बाटली
*परमपूज्य गुरु माऊलींना अपेक्षित असलेल्या संकल्पात संकल्पित होऊन अब्जंचंडी अंतर्गत सेवा रुजू करायचे आहे तरी जास्तीत जास्त सेवेकरी भाविक भक्तांनी उपस्थित राहून सेवा रुजू करावे असे आवाहन करण्यात आले आहे.