भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण !
![Simply Easy Learning](https://i0.wp.com/muktaivarta.com/wp-content/uploads/2024/05/Blue-and-White-Modern-We-Are-Hiring-Flyer_20240518_215836_0000.jpg?resize=1600%2C1069)
मुक्ताईनगर : सहकार महर्षी वारकरी भुषण स्व.भाऊसाहेब प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त पंचदिनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन मूळ मंदिर येथे करण्यात आले आहे. पारायणाचा आरंभ भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून करण्यात आला. ग्रंथवाचन संदिप महाराज खामणीकर करणार आहेत. यावेळी रविंद्र महाराज हरणे, ईश्वर राहणे सह भाविक भक्त उपस्थित होते.
आज गुरुवार दि.19 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या पारायण सोहळ्याची दि.22 सप्टेंबर रोजी पुण्यतिथी दिनी काला कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल.