मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त राबविले सदस्य नोंदणी अभियान
मुक्ताईनगर : एक नेता, एक झेंडा आणि एक विचार या ध्येयावरून चालण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या बाळकडूमुळे आज शिवसेनेचा वटवृक्ष झाला असून आज शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौक येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.

तालुका प्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील , जीवराम कोळी, शहर प्रमुख गणेश टोंगे युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान , नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे, विभाग प्रमुख गोलू मुऱ्हे, देवानंद वंजारी, अनमोल ठेकेदार, सलीम खान, दीपक खुळे , संतोष माळी, निलेश घुले, राजू तळेले,वसंत भलभले , प्रवीण चौधरी पप्पू मराठे आदींसह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक बांधव उपस्थित होते.














