मुक्ताईनगर : रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील पुरातन काळभैरव मंदिर हे देवस्थान भक्तांच्या दृष्टीने खूप श्रद्धेचे ठिकाण असून येथे दर आमवस्या ला मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातून भाविक भक्त होम हवन आणि काळ भैरवष्टक वाचन करण्यासाठी जवळ जवळ 6 ते 7 हजार भाविक दर्शनाला येतात आणि दर वर्षी कालाष्टमि ला येथे मोठा यात्रोत्सव साजरा केला जातो. तसेच 11 किलो चांदी च देवाचं मुकुट आणि सोन्या चे डाग दागिने मंदिरात आहे. येथे भाविकांची प्रचंड वर्दळ असते. येथे भाविकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने या मंदिराला “क” वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त व्हावा यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे आज दि.१७ जून २०२२ शुक्रवार रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी लेखी पत्रव्यवहार करून मागणी केल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बैठकीत मुक्ताईनगर तालुक्यातील थोरगव्हाण ता.रावेर येथील पुरातन काळभैरव मंदिर देवस्थानास “क” वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा ची मान्यता मिळाली आहे.