महाराष्ट्र शासनाच्या “ज्ञानोबा तुकाराम” पुरस्काराने, संजय महाराज पाचपोर यांना केले जाणार सन्मानित !
महाराष्ट्र राज्य शासनामार्फत संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार , गो-सेवक , संत साहित्याचे अभ्यासक लेखक संजय महाराज पाचपोर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने आजदि.४ सप्टेंबर २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जे. भोसले मार्ग, मंत्रालय समोर मुंबई येथे सायं. ६.३० वाजता सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
दरम्यान , संजय महाराज पाचपोर यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.
राज्य शासनामार्फत संत सहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या लेखकास/मान्यवरास ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारावे स्वरुप रु.१०.०० लक्ष, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. सन २०२४ या वर्षीचा पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना शासनाने घोषित केला असून त्याबददल आपले मनपूर्वक अभिनंदन !