राज्य व्यापी बेमुदत संप,
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश !
महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या मूलभूत प्रश्न व मागणी याकडे दुर्लक्ष होत आहे त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मुक्ताईनगर नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या मूलभूत प्रश्न व मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचप्रमाणे 29 ऑगस्ट 2024 पासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन सुरू झालेले असून या संबंधित पूर्व सूचना देणारे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांना देण्यात आले होते.
काय आहेत मागण्या –
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद नगरपंचायतीमधील सन 2005 नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्यसंवर्गातील जवळपास 3000 अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील 60,000 च्या वर कर्मचारी वर्ग यांच्यात असंतोष आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहेत. संघटनेचे विशेष सभा 14 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या निर्णयानुसार संघटनेच्या निवेदनातील समस्या व मागण्या यावर दिनांक 28 ऑगस्ट 2024 पर्यंत अस निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनांमार्फत जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच संघटनेच्या निवेदनातील समस्या व मागण्याकरिता दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला होता. परंतु यासंदर्भात शासनातर्फे कुठलाही निर्णय न झाल्याने राज्य होत असलेल्या आंदोलनात सहभागी होत मुक्ताईनगर नगरपंचायत अधिकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक दीपक जग्रवाल, लेखापाल श्रीपाद मोरे, कर निरीक्षक अच्युत निल, कर निरीक्षक श्रीमती शालू डोंगरे यांच्याशी कार्यालतीन कर्मचारी नितीन महाजन , गणेश कोळी, किशोर महाजन , गंभीर गुरचळ,गजानन सुरंगे आदींनी बेमुदत संप आंदोलनात सहभाग घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनामार्फत जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यसंवर्ग पदांचा सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेमध्ये समावेश करून सेवार्थ नंबर मिळणे, सहाय्यक आयुक्त तथा मुख्याधिकारी गट ब पदासाठी 60% जागा राज्यसंवर्गातील अधिकाऱ्यामधुन पदोन्नतीने भरण्यात याव्या, नगरपरिषदांमधील कार्यरत अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे वेतन लेखा कोषागारमार्फत करण्यात यावे या मुख्य मागण्यांसह विविध मागण्याकरीता आज दिनांक 29.08.2024 पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात राज्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायती यामध्ये कार्यरत असणारे सर्व संवर्ग अधिकारी / कर्मचारी सहभागी झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद/ नगरपंचायतीमधील सन 2005 नंतर नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली असल्याने आहे सेवानिवृत्तीनंतर कोणती योजना सुरू आहे याबाबत शाश्वती नाही. नवीन नगरपरिषद/ नगरपंचायतमधील समावेशनाने सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना व नियतकालानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे पेन्शन लागू झालेले नाही त्यामुळे नगरपरिषद/ नगरपंचायतीतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांमधून कमालीचा रोष व्यक्त होत आहे. या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटनेमार्फत शासनास नगर विकास विभागास व नगरपरिषद प्रशासन संचालन वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्येबाबत व मागण्यांबाबत शासन उदासीन असून त्याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करत आहे अशी कर्मचाऱ्यांची धारणा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे.
मोठया प्रमाणावर संवर्ग अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने राज्यातील नगरपरिषदा/ नगरपंचायती चे कामकाज होणार ठप्प :-
संपात राज्यातील नगरपरिषद/ नगरपंचातीचे प्रशासकिय अधिकारी, कर निरिक्षक, लेखापाल, स्थापत्य अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, स्वच्छता निरीक्षक इत्यादी सुमारे 2000 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्यामुळे त्यांच्या विभागाचे कामकाज ठप्प होणार असुन एकंदर या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठया प्रमाणात बसणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सध्याच्या महत्त्वाकांशी योजनेच्या अंमलबजावणीवर होणार विपरीत परिणाम :-
सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री व वयोश्री योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना तसेच आयुष्मान भारत योजना या विवीध योजनेअंतर्गत नगरपरिषद/नगरपंचायतमध्ये लाभार्थ्यांचे फॉर्म भरणे/मंजुर करणे याबाबत कामकाजावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत जिल्हा- जळगाव मधील अधिकारी / कर्मचारीदेखील संपावर :-
महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना यांचेमार्फत नगरपरिषद अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन, पदोन्नती, सेवार्थ नंबर मिळणे, कोषागरतून वेतन मिळावे यासह विविध प्रलंबित मागण्यांकरिता दिनांक 29.08.2024 पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात आज सर्व महाराष्ट्रातील संवर्ग अधिकारी कर्मचारी यांचेसह मुक्ताईनगर नगरंचायतीचे संवर्ग अधिकारी सहभागी झाले असून शासनाने या मागण्या मंजूर करावी याकरिता विनंती करण्यात आली आहे.