कुऱ्हा व वढोदा शहराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेतर्फे नियुक्त्या !
पहा कोणा कोणाची लागली वर्णी
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील मुक्ताईनगर विधानसभेतील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा व वढोदा जिल्हा परिषद गटातील प्रमुख शहरे असलेले कुऱ्हा व वढोदा या शहरातील खालील प्रमाणे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव श्री भाऊसाहेब चौधरी यांच्या संमतीने जाहीर करण्यात आलेल्या आहेत असे शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्हा परिषद गट कुऱ्हा व वढोदा कार्यकारिणी कुन्हा शहर
शहर प्रमुख – मंगेश विजय पाटील
उप शहर प्रमुख सुधाकर प्रभाकर भिसे
उप शहर प्रमुख अविनाश विश्वनाथ सावळे
वढोदा शहर
शहर प्रमुख भगवान रामभाऊ केदार
उप शहर प्रमुख- नामदेव रामदास पाटील
उप शहर प्रमुख- दीपक दुर्गा सोळंके
दरम्यान , नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना सचिव श्री भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख समाधान महाजन, शिवसेना रावेर लोकसभा महिला आघाडी संपर्क प्रमुख संजनाताई पाटील, उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, जिल्हा संघटक सुनील पाटील, उपजिल्हा संघटक पंकज कोळी, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, जिल्हा समन्वयक प्रवीण पंडित , उपजिल्हा समन्वयक आरिफ आझाद, तालुका प्रमुख नवनीत पाटील आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत