https://muktaivarta.com/?p=2492
आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने संत मुक्ताई मूळ मंदिर कोथळी व शिरसाळा हनुमान मंदिरासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर*
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील धार्मिक तीर्थक्षेत्र असलेले संत मुक्ताई sant muktai मूळ मंदिर कोथळी Kothali व शिरसाळा हनुमान मंदिर Shirsala Hanuman Temple या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा असून शासन दरबारी आमदार चंद्रकांत पाटील MLA Chandrakant Patil यांच्या सततच्या पाठपुराव्याने दोघे मंदिरांसाठी 6 कोटी रुपयाचा भरभरून निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2024-25 (Regional Tourism Development Scheme 2024-25 of Department of Tourism and Cultural Affairs, Government of Maharashtra) अंतर्गत विकास महामंडळाशी संबंधित विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय क्रमांक : टीडीएस 2024/06/प्र. क्र.120/पर्यटन-1 हा शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2024 रोजी झालेला आहे.
आमदार चंद्रकांत पाटील MLA Chandrakant Patil यांनी सतत शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर तालुक्यातील आदिशक्ती श्री संत मुक्ताई मूळ मंदिर कोथळी येथील पर्यटन क्षेत्र विकास करण्यासाठी 5 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिर परिसर पर्यटन क्षेत्र विकास करणे कामी 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये आमदार पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदार संघातील दोघी मंदिरांसाठी एकूण 6 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.यामुळे मतदार संघातील भाविक व वारकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्री व आमदारांनी दिलेला शब्द पाळला –
संत मुक्ताई पालखी सोहळा प्रस्थान होते त्या दिवशी मंत्री गिरीष महाजन Minister Girish Mahajan , आ.चंद्रकांत पाटील यांनी पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी लवकरच निधी मंजूर करण्याचा शब्द दिला होता, विशेष म्हणजे पालखी स्वगृही येण्याच्या आत सुमारे 5 रुपये कोटी निधी मंजूर करून मंत्री व आमदारांनी शब्द पाळल्याने , संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई कोथळी मंदिर व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज तसेच असंख्य वारकरी बांधवांतर्फे आभार मानण्यात येत आहेत.
१) आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधी स्थळ मूळ मंदिर (कोथळी) मुक्ताईनगर या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संत मुक्ताई जीवन चरित्र भीतीचित्र डिजिटल स्वरूपात साकारणार !
२) भव्य प्रवेशद्वार
३) दोन मजली भक्त निवास व
४) सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांच्या मंदिर जीर्णोद्धाराचे तिर्थक्षेत्र विकास निधीतून काम सुरू होते परंतु गेल्या काही काळापासून निधी रखडल्यामुळे मंदिराचे उर्वरित कामही रखडलेले आहे. त्यामुळे या कामाच्या संदर्भात देखील पाठपुरावा होऊन लवकरात लवकर निधी प्राप्त व्हावा व मंदिराचे रखडलेले काम देखील पूर्णत्वास जावे अशी वारकरी व भाविकांची भावना आहे.
जाहिरात
कपडे, मोबाईल, इतर कोणतीही वस्तू Online खरेदी करायची तर मग 100 विश्वासू वेबसाईट आहे…
यावर क्लिक करून तुम्ही कोणतीही वस्तू बिनधास्त खरेदी करू शकतात..
टीप : शक्यतो Cash On Delevery वस्तूच खरेदी करा..