लाडका ठेकेदार ! करोडोंची कामे मात्र बनावट कागद पत्रांचा सहारा घेवून कोण करतोय शासनाची फसवणूक ?
• बनावट कागद पत्रांच्या आधारे ठेकेदार बनल्याचा वंचित बहुजन आघाडी आरोप !
• अबब ठेकदाराची मुक्ताईनगर महावितरण विभागात लाखो करोंडोंची कामे ?
• आरोप खरा ठरल्यास कोण असणार जबाबदार ?
• कोणावर होईल कारवाई ?
• तक्रारदाराला अपेक्षित माहिती दिली जात नसल्याने , खोट्या कागद पत्रांच्या संशयावर होणार का शिक्कामोर्तब ?
• कोण आहे हा ठेकेदार ?
• ठेकदारांला पाठीशी घालून कोण कोण उल्लू साधतेय ?
महाराष्ट्रात सध्य स्थितीत पूजा खेडेकर (IAS) यांनी शासनाकडे जमा करण्यात आलेल्या बनावट दस्तावजांची चर्चा इलेक्ट्रॉनिक तसेच वृत्तपत्रांमध्ये जोरदार सुरु असून महाराष्ट्रातील इतरही अनेक प्रशासकीय विभागांमध्ये पैशाने हापापलेल्या प्रशासनातील मदमस्त अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे बनावट खोट्या कागदपत्रांच्या आधारावर प्रशासनात आज रोजी लायकी नसलेले बनावट अधिकारी,ठेकेदार कार्यरत असून अनेक प्रकरणे पूजा खेडेकर यांच्या प्रकरणाप्रमाणे उघडकीस येत आहेत. व तोच प्रकार मुक्ताईनगर महावितरण विभागीय कार्यालय अंतर्गत विद्युत निरीक्षण विभागाच्या भोंगळ भ्रष्ट कारभारामुळे सुरू असल्याच्या चर्चेने, वंचित बहुजन आघाडीचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अमोल बोदडे यांनी विज वितरण कार्यालया अंतर्गत बनावट दस्तावेज यांच्या आधारावर अथवा बनावट विद्युत पर्यवेक्षकाचे क्षमता प्रमाणपत्र असल्याच्या संशयावरून मुक्ताईनगर विभागात काम करणारा ठेकेदार यांची माहिती विद्युत निरीक्षण विभाग कार्यालय मुंबई येथील जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक विद्युत निरीक्षक कक्ष-१ श्री. वि.प्र. रोझोदकर यांच्याकडे मागितली असता त्यांनी सदर माहिती मुक्ताईनगर महावितरण विभागातील बनावट ठेकेदाराच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या दबावात माहिती देण्यास टाळले असल्याचे अमोल बोदडे यांनी निवेदनात म्हटले आहे त्यामुळे तक्रारदाराच्या संशयावर शिक्कामोर्तब झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. संबंधीत मुक्ताईनगर विज वितरण विभागात काम करणारा ठेकेदार यांचे विद्युत पर्यवेक्षकाचे क्षमता प्रमाणपत्र बोगस असण्याचा पुरावा म्हणजे सदर ठेकेदार हा अशिक्षित अंगठे बहादूर असून त्याला लिहिता, वाचता येत नाही त्यामुळे त्यांनी संबंधित विद्युत विभाग कार्यालयातून ज्या कागदपत्रांच्या आधारावर विद्युत पर्यवेक्षकाचे क्षमता प्रमाणपत्र मिळवले अथवा सदरील क्षमता प्रमाणपत्र हे बनावट असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदरील ठेकेदार यांच्या विद्युत पर्यवेक्षकाचे क्षमता प्रमाणपत्र देतेवेळी त्यांनी सादर केलेल्या सर्व शैक्षणिक पात्रता कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात यावी अथवा सदरील प्रमाणपत्र बनावट आहे की काय याचीही चौकशी करून योग्य तो अहवाल तात्काळ सादर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अमोल बोदडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबंधित बनावट ठेकेदारा महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लाडका ठेकेदार असल्याचेही महावितरण विभागात बोलले जात आहे.त्यामुळे सदरील निवेदनाच्या अनुषंगाने जर ठेकेदार बोगस कागद पत्रांच्या असे प्रमाणपत्र बनवून लाखो करोडोंची बिले संबंधित विभागातून काढून शासनाची फसवणूक करीत असेल तर शासन कारभारात आंधळ दळतंय ,कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती समोर आल्यास शासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.