कामिका एकादशी : संत मुक्ताई समाधी स्थळी काय घडलं पहा
धन्य आजि दिन संत दर्शनाचा,
आषाढी वारी नंतर येणारी कामिका एकादशी ला अनन्य साधारण महत्त्व असून पंढरीश परमात्मा श्री. विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेतल्यानंतर संत दर्शनाला वारकरी संप्रदायात खूप महत्त्व असते. त्या अनुषंगाने विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश व खानदेशातील लाखो वारकरी व भाविक पायी दिंडी सोहळे, चार चाकी , दुचाकी तसेच मिळेल त्या वाहनाने जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधी स्थळ कोथळी, मुक्ताईनगर येथे दर्शनासाठी येत असतात. आज एकादशी निमित्त आलेल्या भाविकांचा आढावा घेतला असता मध्यरात्री तीन वाजेपासूनच भाविकांनी दर्शन बारीत गर्दी केली होती . लाखो भाविकांची मांदियाळी तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे दिसून आली.तर आज वरणगाव येथील श्री गौरव पाटील या भाविकाने आई साहेब मुक्ताई दरबारात आकर्षक सजावट केलेली होती. तर संत मुक्ताई साहेबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक व वारकऱ्यांच्या मुखातून एकाच अभंग वाणी ऐकू येत होती..
धन्य आजी दिन संत दर्शनाचा ।
आनंत जन्मीचा क्षीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे ।
कदा न सोडावे चरण त्यांचे ॥2॥
*युट्यूब व्हिडिओ लिंक*
*फेसबुक व्हिडिओ लिंक*