मुक्ताईनगर नगरपंचायत करतेय अजब कारभार ,
मुख्य रस्ते करतेय साफ, तर गल्ली बोळात मात्र घाणीच्या साम्राज्याचा होतोय ताप !
मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील हायवे उड्डाण पूल ते बुऱ्हानपुर रोड हिंदू स्मशानभूमी व प्रवर्तन चौक ते तालुका क्रीडांगण अशा मुख्य रस्त्यावर स्वच्छतेवर भर देवून काम करतेय यात रातोरात झाडू मारून कचरा उचलून शहर किती चांगले स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.हे भासविण्याचा प्रयत्न करून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा प्रयत्न करीत आहे.
कारण हे दोन्ही रस्ते म्हणजेच नवीन मुक्ताई मंदिर ते बुऱ्हाणपूर रोडवरील हिंदू स्मशान भूमी पर्यंत चा रस्ता इंदौर – छत्रपती संभाजी नगर महामार्ग असून हा रस्ता MSRDC विभागाच्या ताब्यात आहे. तर प्रवर्तन चौक ते तालुका क्रीडांगण पर्यंत असलेला भुसावळ रोड हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग , मुक्ताईनगर च्या ताब्यात आहे. त्यामुळे या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता ही सर्व जबाबदारी त्या त्या विभागाची आहे . आणि त्या रस्त्यांवर तसे मेन्टनंस बिले सुद्धा संबंधित विभाग काढत असतात.
मग त्याच रस्त्यांवर नगर पंचायत प्रशासन स्वच्छ भारत मिशन राबवून येथे लाखो रुपये बिले संबंधीत ठेकेदाराला अदा कशी करू शकते ? हा मुळात प्रश्न उद्भवतो.
तर दुसरीकडे शहरातील नागरिकांकडून स्वच्छ भारत मिशन साठी वेगळा कर आकारून सुविधा मात्र दुसरीकडे देण्यावर भर का देत आहे.
तसे पाहता प्रत्येक गल्लीत झाडू मारणे, रस्त्यावर साचनारा कचरा संकलन करणे , गटारी तील निघालेला घण कचरा उचलणे आदी मागणी नागरिकांनी केल्या असता संबंधित नगरपंचायतीचे अधिकारी माणसांची कमतरता असल्याचे उत्तरे नागरिकांना देतात.तर ठेकेदारांची देखील उत्तरे चकरात टाकणारी असून स्वच्छ भारत मिशन वर खर्च होणारी लाखो रुपयांची देयके केवळ ठेकेदार आणि काही लोकांचे खिसे भरण्याचे काम करीत आहे का ?
नागरिकांकडून वसूल होणाऱ्या करा (Tax) पोटी त्यांना योग्य त्या सुविधा नगरपंचायत प्रशासन पुरवणार का ? प्रत्येक प्रभागातील गल्लीत रस्त्यांवर स्वच्छता अभियान प्रत्यक्षात दिसून येणार का ? असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.