मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत, रावेर तालुक्यातील दोघे ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी
आ.चंद्रकांत पाटलांच्या (mla chandrakant Patil) प्रयत्नांना यश !
ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी शासन, ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: ग्रापंई-२०२३/प्र.क्र.०८/बांधकाम-४ ५ वा मजला, बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००१. तारीख : २६ फेब्रुवारी, २०२४ या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आले असून रावेर तालुक्यातील वाघोदा खू (२० लक्ष ) व कोचुर खू.(२० लक्ष) असे एकूण ४० लक्ष रू. निधी सह ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी मंजुरी मिळाली असून आ.चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांच्या कडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून स्वतः ची हक्काची इमारत आता सदरील ग्रामपंचायतींना उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.