Thursday, October 30, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Symbolic hunger strike to be held in Muktainagar on Shiv Jayanti, farmers warned !!

Santosh Marathe by Santosh Marathe
February 15, 2024
in मुक्ताई वार्ता
0
Symbolic hunger strike to be held in Muktainagar on Shiv Jayanti, farmers warned !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
शिवजयंती दिनी, मुक्ताईनगर येथे होणार लाक्षणिक उपोषण, शेतकऱ्यांनी दिला इशारा !!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात रयत ही राम राज्याप्रमाणे सुखाने नांदत होती. अगदी शेतकऱ्यांच्या काडीला ही धक्का लागू नये अशी सक्त ताकीद शिवरायांनी त्यांच्या सैन्याला दिली होती. अशा महान युगपुरुष छञपती शिवरायांचा जन्मोत्सव दि.19 फेब्रुवारी रोजी साजरा होत असून याच दिवसाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध प्रकल्पातून संपादित होणाऱ्या जमिनी संदर्भात त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
     त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर शहराला लागून असलेल्या शेतजमिनी ज्या की भविष्यात रहिवासी प्रयोजनार्थ  N.A होऊ शकतात अशा जमिनी व काही जमिनी या अगोदरच N.A झालेल्या आहेत अशा क्षेत्रातून बोदवड उपसा सिंचन योजनेतील सुमारे 2.5 मीटर व्यासाचे प्रत्येकी दोन पाईप लाईन साठी महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या अधिनियम 2018 नुसार शेतकऱ्यांच्या जमिनीचे वापर हक्क संपादन व अधिग्रहण करून त्याबद्दल त्यांना योग्य न्याय नुकसान भरपाई न देता वापर हक्काचे शासनाकडून संपादन केले जात आहे.
     याबाबत संबंधित शासकीय विभागाकडे जमीन धारकांकडून तालुका ते मंत्रालय अशा सर्व स्तरावर सातत्याने अर्ज विनंत्या करून अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून विनंती अर्ज देवूनही जमीन धारकांना संबंधितांकडून योग्य दिलासा मिळाला नसून नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही.त्यामुळे संबंधित जमीन धारक शेतकरी बांधव व त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ झालेले असून त्यांनी छञपती शिवरायांचा जन्मोत्सव दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा होत असून याच दिवसाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध प्रकल्पातून संपादित होणाऱ्या जमिनी संदर्भात त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर यांची आहेत नावे, सुभाष शुरपाटणे, चंद्रकांत शुरपाटणे, बदार खा दिलर खा, चंद्रकांत कोलते,रमणलाल जैन, सुगनचंद जैन,दिनकर पाटील, भागीरथी खेडकर, सुधाकर खेडकर, रघुनाथ महाजन, वामन भारसाके, पुंडलिक धनगर, तुकाराम चौधरी, चंद्रशेखर पुराणिक, नंदकिशोर पुराणिक, हितेंद्र जैन, नरेंद्र जैन, नारायण चौधरी, विद्या चौधरी, प्रभाकर चौधरी, भास्कर चौधरी, प्रकाश सरोदे, तुषार महाजन, प्रदीप बेंडाळे ,माधव त्र्यंबक पाटील, पुंडलिक पाटील, पांडुरंग कोलते, बाळू लक्ष्मण पाटील आदींनी दिला आहे इशारा …
Tags: farmers warned !!Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar NewsSymbolic hunger strike to be held in Muktainagar on Shiv Jayantiमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

Modi Awas Gharkul Yojana should provide benefits to freed castes and nomadic tribes – MLA. Chandrakant Patil

Next Post

413 houses in the rehabilitated 4th phase of Muktainagar and houses in this village in Raver taluka got the green light from the government.

Santosh Marathe

Santosh Marathe

Next Post
413 houses in the rehabilitated 4th phase of Muktainagar and houses in this village in Raver taluka got the green light from the government.

413 houses in the rehabilitated 4th phase of Muktainagar and houses in this village in Raver taluka got the green light from the government.

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group