Modi Awas Gharkul Yojana should provide benefits to freed castes and nomadic tribes – MLA. Chandrakant Patil
मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना लाभ द्यावा – आ.चंद्रकांत पाटील
सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी दि.९ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्प सादर करतांना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरु करण्याची घोषणा केली होती. परंतु विविध स्तरावरून या योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना लाभ मिळावा अशी मागणी होत असल्याने तसेच आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पाठपुरावा लावून धरल्याने ,राज्य शासनाने, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा, शासन निर्णय क्रमांक- वगृयो- २०२३/प्र.क्र.३३/योजना-५ मंत्रालय, मुंबई दि. ३० जानेवारी २०२४ अन्वये विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पात्र लाभार्थ्यांचा समावेश “मोदी आवास घरकुल योजनेत” करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तरी सदरील संदर्भीय शासन निर्णयानुसार जिल्हयातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आपले स्तरावरून आदेशित करून “मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पात्र लाभार्थ्यांचे घरकुल मागणीचे प्रस्ताव स्विकारणे कामी उचित ते आदेश व्हावेत अशा सूचना आ.चंद्रकांत पाटील यांनी लेखी पत्राद्वारे जळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना केल्या आहेत.