Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

अमिताभ महानायक संघर्ष का बादशाह ; तर  चंद्रकांत पाटील विकास व संघर्षाचे महानायक 

Admin by Admin
October 11, 2023
in मुक्ताई वार्ता
0
अमिताभ महानायक संघर्ष का बादशाह ; तर  चंद्रकांत पाटील विकास व संघर्षाचे महानायक 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अमिताभ महानायक संघर्ष का बादशाह ;
तर  चंद्रकांत पाटील विकास व संघर्षाचे महानायक
विश्वनाथ बोदडे यांच्या दृष्टिकोनातून :
आज महानायक अमिताभ बच्चन यांचा 81 वा वाढदिवस आहे. या वयात तरुणांना लाजवेल अशी ताकद,  सकारात्मकता, ऊर्जा , कोणतेही  काम कमी नसतं हाच ध्यास पुढे घेऊन चालणारे आणि शिक्षण हेच आपल्याला आपला हक्क मिळवून देऊ शकतो  असे सर्वगुण अमिताभ बच्चन यांच्या मध्ये दिसत आहे , हे गुण संघर्ष  व अनुभवाने  माणसामध्ये भरले जातात याचे कारण प्रामाणिकपणा, साधा स्वभाव आणि संघर्ष करण्याची ताकत  आहे.
*लहरो से डर कर नैया ,पार नही होती और कोशिश करने वालों की कभी हार नही होती |*
 ही कविता आहे श्री अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची शब्द शब्दांमध्ये प्रेरणा (मोटिवेशन) भरलेले आहे अमिताभ बच्चन असे म्हणतात की,
*हर व्यक्ती मे एक हिरा जडा आहे लेकिन चमकता वही है जो जादा  घिसता है |*
 अमिताभ बच्चन यांच्या जीवनामध्ये खूप मोठे चढ-उतार त्यांनी बघितलेले आहेत.त्यांच्या आयुष्याची सुरुवातच फ्लॉप शो ने झाली , तब्बल 12 पिक्चर सातत्याने फ्लॉप झाले , हया अपयशाने खचून  न जाता त्यांनी पुढे आपला प्रवास सुरूच ठेवला , त्यानंतर जंजीर पिक्चर ने त्यांना यशाचा मार्ग दाखवला, काही काळ प्रवास सुरू असतानाच परत नियतीने परीक्षा घेतली ती ABCL  ह्या कंपनी मध्ये येवढे नुकसान आले की घर, गाडी  तर गेलेच पण बँकेत सुद्धा दिवाळखोर झाले, त्यानंतर पुढे काय हाच मार्ग शोधत असताना KBC मुळे एक संधी आली पण पण एक मोठा कलाकार छोट्या पडद्यारील टीव्ही शो मध्ये कसे काम करणार आणि कसे???
*कोणतेही काम छोटे नसते त्याला फक्त न्याय देता आला पाहिजे*
 अमिताभ यांनी प्रत्येक वेळी कोणतेही काम आणि कोणताही मानुस लहान नसतो हेच धेय पुढे ठेऊन काम केले आणि ABCL कंपनीच्या माध्यमातून झालेले सर्व नुकसान तर भरलेच परंतु सर्व दुनियामध्ये एक आदर्श अभिनेता ठरून महानायक ठरले , ज्या आवाजाला आकाशवाणी ने नकार दिला होता त्याच आवाजाने आपला लोह तयार करून आज आपल्या कार्यामुळे जगात गाजत आहे
*मैत्री व वचन पाळणारा अभिनेता*
संपूर्ण फिल्म क्षेत्रात काही ठराविक अभिनेते आहेत ते मैत्री आणि वचन याला पाळतात या मध्ये श्री अमिताब जी यांचा एक नंबर आहे, दिलेला शब्द पाळणे व जुन्या आणि नवीन मित्रांना सांभाळून ठेवणे, प्रत्येकाच्या सुख दुःखा मध्ये सहभाग घेणे हे पहिल्यापासून नित्यानियमाने पाळत असतात.
आज जनतेच्या प्रामाणिक, एनर्जेटीक , सर्वगुण संपन्न असा अभिनेता, महानायक कोणी असेल तर श्री अभिताभ जी , अमिताभ जी 👏👏👏👏
याचे साम्य मला तिर्थक्षेत्र संत मुक्ताईनगरचे आमदार आमचे कर्तव्यदक्ष मित्र चंद्रकांतजी पाटील यांच्या कार्यशैलीत दिसते.
चंद्रकांतभाऊंच्या जीवनामध्ये सुद्धा खूप मोठे संघर्ष आलेले आहेत. या संघर्षाचा पाढा बऱ्याच लेखकांनी लिहिला आणि वाचला आहे आणि तो सर्वश्रुत आहे परंतु भाऊंचे काही वैशिष्ट्यपूर्ण गुण जे तंतोतंत अमिताभजी यांच्या स्वभावाला अनुरूप आहेत असे गुण मी नमूद करत आहे, भाऊंनी आपले बालपणीचे मित्र, संघर्ष काळात त्यांच्या सोबत असलेले सर्व मित्र कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय देऊ अशी भूमिका घेणारे असे मित्र त्यांनी कधीच सोडले नाही
*आई बहिणीची काळजी घेणारे*
मला आणि जनतेला दिसलेले सर्वात साम्य काही असेल तर समाजातील आई , बहीण व स्री यांना सन्मान देणारे दोघं अहेत त्यामुळेच दोघं आपल्याला आपल्या क्षेत्रात आज जनतेच्या आशिर्वादाने आपल्या हाताने समाजासाठी चांगले काम करत आहे व हीच त्यांची मोठी ऊर्जा आहे असे माझे प्रामाणिक मत आहे
*मतदार संघात विकास पुरुष अशी छाप पडत आहे*
ज्या ज्या व्यक्तीने जीवनामध्ये संघर्ष पाहिला असतो, त्यासाठी अहोरात्र मेहनत केलेली असते त्यासाठी त्यांनी आपल्या  परिवाराने मित्रांनी सुद्धा कष्ट सहन केलेले असतात आणि ज्या क्षेत्रांमध्ये आपला स्वतःचा एकही नातेवाईक नाही हे माहीत असून सुद्धा आमदारकी पदापर्यंत पोहोचणे हे किती कठीण कार्य असते आणि त्यातल्या त्यात समोर एक राज्यस्तरीय मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारा व्यक्तिमत्व समोर असताना सुद्धा मोठ्या धैर्याने, कष्टाने, जिद्दीने आणि लोकांच्या प्रेमाच्या आशीर्वादाने आज आमदारकीपर्यंत पोहोचलेला हा माणूस मतदारसंघात विकास पुरुष ठरत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे काय तर ह्या *व्यक्तीमध्ये त्यांनी स्वतःला करून घेतलेले बदल आहेत* हे बदल असे आहेत की जी व्यक्ती या पदावर पोहोचलेली आहे त्या पदाला न्याय दिला नाही तर आपण ते पद घेऊन काही उपयोग नाही
 त्यासाठी जनतेच्या विकासासाठी आपण जनता दरबार भरून किंवा जनतेच्या समोर उभे राहून त्याचबरोबर सरकार दरबारी सरकारशी झगडा करून वेळप्रसंगी प्रशासनाचा  अधिकाऱ्यांचा रोष स्वतःवर घेऊन परंतु जनतेचे काम झालेच पाहिजे आणि मागील 30 वर्षापासून विकास झालेला नाही ह्या संत मुक्ताईनगरचा त्या विकासाला न्याय दिला पाहिजे ,
 मुक्ताईनगर मध्ये एमआयडीसी आली पाहिजे तरुणांच्या हाताना रोजगार  मिळाले पाहिजे, आपले तरुण आपले गाव सोडून जातात आपल्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे आणि त्यांना इथेच मातृ भूमीत काम मिळाले पाहिजे.
हे गाव टपरी मुक्त, व्यसनमुक्त आणि रोजगार युक्त विकास युक्त व्हायला पाहिजे अशी जिद्द आणि असा स्वभाव त्या माणसाने बदल केलेला आहे त्या माणसाला आज मी त्यांच्याबरोबर तुलना करण्यासाठी कारण विकासासाठी आपल्या पायाला भिंगरी लावून दिवसाची रात्र करत आहेत आणि त्यांच्या या कार्य कर्तुत्वाने एक आमदार कसा असतो जनतेला समजत आहे की आजच्या काळामध्ये विकासाचे  कार्य करत आहे आणि सरकार दरबारातून  निधी आणत आहे. योग्य मार्गाने काम करत आहे असे आमदार चंद्रकांत पाटील हे कार्य करत आहेत त्यांचा प्रामाणिकपणा ,शांत स्वभाव, स्वतःमध्ये करून घेतलेले बदल, हेच यांच्या विकासाचे गमक आहे मला श्री अमिताभजी यांच्याशी  तुलना करताना एक दिसत आहे की जे अमिताभजी मध्ये जिद्द मेहनत, लगन, प्रामाणिकपणा, सकारात्मकता आहे ,तेच मला चंदूभाऊ मध्ये दिसत आहे त्यामुळेच मी हे धारिष्ट करत आहे. त्यामुळे या दिनी सदीचे महानायक अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! आणि चंदूभाऊंना देखील पुढील कार्यासाठी मी खूप खूप  मंगलमय शुभेच्छा देतो असेच आपले सर्व समावेशक कार्य सुरू ठेवा अशा सदिच्छा देतो.
श्री.विश्वनाथ बोदडे
शेअर बाजार अभ्यासक, नाशिक.
Tags: Amitabh BachchanMLA Chandrakant PatilMuktainagar Newsअमिताभ बच्चन
Previous Post

Next Post

Accident : मुक्ताईनगरात दुचाकी एस टी च्या मागच्या चाकाखाली ! दुचाकी स्वार जागीच ठार तर दुसरा बचावला !

Admin

Admin

Next Post
Accident : मुक्ताईनगरात दुचाकी एस टी च्या मागच्या चाकाखाली ! दुचाकी स्वार जागीच ठार तर दुसरा बचावला !

Accident : मुक्ताईनगरात दुचाकी एस टी च्या मागच्या चाकाखाली ! दुचाकी स्वार जागीच ठार तर दुसरा बचावला !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group