शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष पदी अफसर खान यांची नियुक्ती !
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे खंदे समर्थक ,विश्वासू सहकारी म्हणून अफसर खान यांची ख्याती आहे.त्यांनी शिवसेनेच्या सभा सभा शेरो शायरी च्या अंदाजाने गाजवलेल्या असून नेते व शिवसैनिकांचे आवडते वक्ते म्हणून त्यांची ख्याती असून यापूर्वी त्यांनी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा संघटक म्हणून त्यांची उत्तम कामगिरी बजावली असून अर्ध्या रात्री पीडित व अपघात ग्रस्तांच्या मदती साठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणुन सर्व धर्मीय समाज बांधवांमध्ये त्यांची ख्याती आहे. याची दखल घेत शिवसेनेचे नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी त्यांना गुरुवारी दि.५ ऑक्टोंबर २०२३ रोजी स्वाक्षरीनिशी नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.
या माध्यमातून अफसर खान यांना आता प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. त्यांच्या नियुक्तीचे अल्पसंख्यांक समाजातून देखील मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम आपण मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी मुक्ताई वार्ता शी बोलतांना व्यक्त केली.
यावेळी डॉ श्रीकांत शिंदे, आ.चंद्रकांत पाटील, नूर मोहम्मद खान, आरिफ आझाद, दीपक माळी, जाफर अली, सुनील पाटील, शकील शेख आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.