CMV वायरसने केळी उत्पादक शेतकरी त्रस्त !
तात्काळ पंचनामे करून मदतीची यांनी केली मागणी
जळगांव जिल्हयामधे मागील 4 ते 5 वर्षा पासुन केळी उत्पादक पट्ट्यामध्ये मोठया प्रमाणावर केळी पिकावर CMV (कुकुंबर मोझॅक वायरस) या वायरस चा मोठा प्रादुर्भाव होत आहे.त्यामुळे लाखोंच्या संख्येने केळी बागांचे प्लांट उपटून फेकून देण्याची दुर्दैवी वेळ शेतकरी बांधवांवर आलेली आहे.आणि अशा वेळी होणाऱ्या नुकसानी मुळे शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. दरवर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकरी केळीची लागवड केल्या नंतर अशी परिस्थीती होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. केळी चे 15 रुपयाचे Tissue Plant नंतर लागवडीचा खर्च ,फवारणी, ड्रिंचिंग, रासायनिक खते आणि नंतर वायरस मुळे फेकायचा खर्च या कठीण परिस्थीतीतून शेतकरी जात आहेत मागील वर्षी शासनाने पंचनामे करून अद्याप शासनाकडुन मदत मिळालेली नाही, त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारे लाखो रुपयांचे आर्थीक नुकसान होत असेल तर भविष्याल जळगांव जिल्हातील शेतकरी केळी पिकाची लागवड करतील किंवा नाहीं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी यांनी स्वतः या विषयामधे लक्ष घालून ताबडतोब पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकरी बांधवांना शासनाकडुन नुकसान भरपाई मिळणेस शिफारस करावी अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी केली आहे.
निवेदनावर विनोद रामदास तराळ (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी माफदा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) ,डॉ. जगदीश तुकाराम (सदस्य, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पार्टी) ,दिनेश सोपानराव पाटील (अध्यक्ष, मुक्ताईनगर तालुका काँग्रेस पार्टी) तसेच ललित रामचंद्र पाटील (कार्याध्यक्ष ,काँग्रेस ता.मुक्ताईनगर ) यांच्या स्वाक्षऱ्या असून सदरील पदाधिकारी यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात वरील मागणी केलेली आहे.