आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर, बोदवड व सावदा शहरासाठी  ४ कोटी रु. मंजूर !

20230601_182355

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर, बोदवड व सावदा शहरासाठी  ४ कोटी रु. मंजूर !

[metaslider id="6181"]

मुक्ताईनगर मतदार संघातील सावदा नगरपरिषद तसेच मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायतींना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन २०२३ २०२४ साठी लेखाशिर्ष (२२१७ १३०१) अंतर्गत सावदा नगरपरिषद, जि. जळगाव रक्कम रू.०.२५ कोटी. बोदवड नगरपंचायत, जि. जळगाव रक्कम रु.१०० कोटी मुक्ताईनगर नगरपंचायत, जि. जळगाव रक्कम रु. २.७५ कोटी एकुण रक्कम रु. ४.०० कोटी रुपये असा निधी महाराष्ट्र शासन,नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक-नपावै २०२३/प्र.क्र.८७-४-१६१/नवि-१६ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- ३१ मे.२०२३ अन्वये मंजूर झाला असून

विविध विकास कामे मंजूर झाली असून यामध्ये बोदवड शहर व तालुक्यातील  राजपूत समाजाच्या मागणीनुसार प्राधान्य देत गट क्र.२३६/२ मध्ये खुल्या भूखंडावर योगा हॉल बांधकाम करणे यासह  विविध विकास कामे  देखील मंजूर झालेले आहेत.सदरील कामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दि.३१ मे२०२३ च्या प्रसिद्धी पत्रकान्वये मंजूर झालेले असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

अ.क्र. कामाचे नाव अंदाजित किंमत
सावदा नगरपरिषद हद्दीतील श्री.स्वामी समर्थ केंद्राजवळ सांकृतिक सभागृह बांधकाम करणे ता.रावेर २५ लक्ष
बोदवड नगरपंचायत हद्दीतील गट क्र.२३६/२ मध्ये खुल्या भूखंडावर योगा हॉल बांधकाम करणे ता.बोदवड ५० लक्ष
बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.७ मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.बोदवड ५० लक्ष
मुक्ताईनगर पंचायत हद्दीमध्ये विविध प्रभागांमध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.मुक्ताईनगर जि.जळगाव २७५ लक्ष
  एकूण ४०० लक्ष

 

error: Content is protected !!