Thursday, October 30, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळेच देश महासत्तेकडे

अर्थतज्ञ विश्वनाथ बोदडे

Santosh Marathe by Santosh Marathe
April 15, 2023
in मुक्ताई वार्ता
0
डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळेच देश महासत्तेकडे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळेच देश महासत्तेकडे

अर्थतज्ञ विश्वनाथ बोदडे
नाशिक:

आज विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे याचप्रमाणे नाशिक मध्ये आडगाव जत्रा परिसर कोणार्क नगर येथे त्रिरश्मी बुद्ध विहारांमध्ये जयंती मोठ्या उत्साहात पार पडली या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अर्थतज्ञ विश्वनाथ बोदडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वाला तारणारे आर्थिक विचार यावर मार्गदर्शन करत होते.

डॉक्टर बाबासाहेब यांनी सर्वच विषयांमध्ये क्रांती केलेली आहे फक्त आपल्या लेखणीच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशभरामध्ये खूप मोठ्या क्रांति केलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे प्रेम पुस्तकांवर केलं तेवढे प्रेम कशावरच केले नाही त्यामुळे या पुस्तकांमध्ये बुद्ध विचारांची खूप मोठी छाप दिसत असते,देशाला मिळालेले संविधान हे खूप मोठी देणगी आहे सामाजिक समरसता म्हणून भारतीय संविधानामध्ये दिसलेली आहे. जगभरामध्ये कोणतेही देशांमध्ये असे संविधान नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरामध्ये कोणता देश कोणत्या कारणांमुळे महासत्ता होऊ शकतो असे नमूद केलेले आहे, त्यामध्ये पहिले कारण दिले होते शस्त्रसाठा दुसरे कारण कच्च तेल तिसरं कारण ड्रग्स म्हणजे मेडिसिन आणि चौथे कारण दिलेले आहे वाटर पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून त्यांनी नदीजोड प्रकल्प ची कल्पना ही खूप वर्षांपूर्वी दिलेली आहे आणि आज आपण बघत आहोत की जगभरामध्ये पाण्याचा तुटवडा आहे आणि भारतामध्ये ऑक्टोबर पर्यंत पाणी पडत असते आणि त्याचबरोबर मध्ये मध्ये पाणी म्हणून शेतकऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान होत आहे परंतु हेच पाणी आपल्या देशासाठी खूप मोठे वरदान ठरणार आहे आणि पुढील काळामध्ये आपण वॉटर एक्सपोर्टर म्हणून एक मोठा देश निर्माण होणारा होता आणि याचा थरावर आपला देश हा सुजलाम सुफलाम होऊन जगामध्ये महासत्ता होणार आहे असे बोदडे यांनी नमूद केले त्याचबरोबर त्यांनी समाजामध्ये आर्थिक साक्षरता येणे खूप गरजेचे आहे कारण समाज विविध अंगांनी जरी कमाई करत असला तरी त्याचे नियोजन त्यांना जमत नसते अयोग्य खर्चांवर जर मर्यादा आणली तर निश्चित पुढील येणाऱ्या संकटांना मात करण्याची ससोटी आपल्याजवळ असू शकते आणि इतर समाजामधील जे चांगले सकारात्मक गुण आहे ते आपण अंगीकारले पाहिजे व आपण सुद्धा व्यवसायाकडे वडले पाहिजे असे सुद्धा त्यांनी नमूद केले

या कार्यक्रमाला स्थानिक माजी नगरसेवक उद्धव निमसे, खेताडे, संदीप लभडे , बागुल काका गांगुर्डे ताई बीटी जाधव रोहन साहेब आर के जगताप रवींद्र जाधव समितीचे अध्यक्ष मिलिंद हिरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यकार भगवान हिरे यांनी केले तर सूत्रसंचालन केदारे यांनी केले

Tags: Astrology NewsJalgaon NewsLatest Marathi News
Previous Post

अनपेक्षित अपघाताने 10 वर्षीय बालकाचा मृत्यू 

Next Post

सबसे कातील, गौतमी पाटील अवघ्या कमी दिवसात सोशल मीडिया स्टार कशी बनली

Santosh Marathe

Santosh Marathe

Next Post
सबसे कातील, गौतमी पाटील अवघ्या कमी दिवसात सोशल मीडिया स्टार कशी बनली

सबसे कातील, गौतमी पाटील अवघ्या कमी दिवसात सोशल मीडिया स्टार कशी बनली

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group